दुचाकी चोरणाऱ्या आरोपीस अटक,पाच दुचाकी जप्त तर चार दुचाकीचे गुन्हे उघड; स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची मोठी कारवाई!

यवतमाळ/प्रतिनिधी : अवधूतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ (एलसीबी) यांनी मोठी कारवाई करत एका संशयिताला अटक केली आहे. या कारवाईत चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून ४दुचाकीचे गुन्हे उघड करण्यात आले आहे.याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या सूत्राने झेप न्यूज दिलेली माहिती अशी की,जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र (अग्नीशस्त्र) बाळगणा-या तसेच अ उघड गुन्हे, आरोपी शोध तसेच मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून अ उघड गुन्हे उघड करुन आरोपी शोध घेणे बाबत सुचना दिल्या आहेत.दि, ७एप्रिल२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे मोटार सायकल चोरी तसेच अ उघड गुन्हे मधील आरोपी शोध व माहीती काढत असतांना गुप्त बातमीदाराव्दारे माहीती मिळाली कि, इसम नामे-प्रणव रणजित मुजमूले रा. सायफळ ता.माहूर जि. नांदेड यांच्याकडे विना क्रमांकची पेंशन प्रो मोटार सायकल असून ती संशयीत असून तो धनोडा फाटा येथे आहे अशी गोपनिय माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी जावून विना क्रमांक पेंशन प्रो मोटार सायकलस्वार प्रणव रणजित मुजमूले वय २१ वर्ष, रा. सायफळ ता. माहूर जि. नांदेड यास ताब्यात घेवून त्याचे ताब्यातील मोटार सायकल चे कागदपत्राची मागणी केली असता उडवा-उडवीचे उत्तरे देवू लागल्याने त्यास विश्वासात घेवून सखोल विचारपूस करुन पोलीसी खाक्या दाखविताच त्याने त्याचेकडील ती मोटार सायकल गेले १५ दिवसापुर्वी यवतमाळ बस स्थानक यवतमाळ येथून चोरी करुन आणल्याचे कबूल केल्याने सदर मोटार सायकलचे चेसीस नंबर व इंजिन नंबरची पडताळणी केली असता अवधूतवाडी पोलीस स्टेशन अप क्रमांक ५५५/२०२५ कलम ३०३(२) भा.न्या.सं मधील चोरीची असल्याची खात्री झाल्याने ती जप्त करुन ताब्यात घेवून नमूद इसम यांस विश्वासात घेवून अधिक पोलीस कौशल्याचा वापर करुन विचारपूस केली असता त्याने यवतमाळ बस स्थानक तसेच परिसरातून आणखी मोटार सायकल चोरी केल्याचे कबूल केल्याने त्याने चोरी केलेल्या ४ मोटार जप्त करुन ताब्यात घेतले.अशा प्रकारे जप्त मोटार सायकलचे चेसीस नंबर व इंजिन नंबरची पडताळणी करुन पुढील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणले १) अवधूतवाडी पो स्टे अप क्रमांक ५५५/२०२५ कलम ३०३(२) भान्यास, २) अवधूतवाडी पो स्टे अप क्रमांक ८८/२०२५ कलम ३०३(२) भान्यास, ३) अवधूतवाडी पो स्टे अप क्रमांक ३०२/२०२५ कलम ३०३(२) भान्यास, ४) अवधूतवाडी पो स्टे अप क्रमांक १८५/२०२५कलम ३०३(२) भान्यास असा एकूण २,७०,०००/- रु किंतमीचा मुददेमाल जप्त केला.अवधूतवाडी अप क्रमांक ५५५/२०२५ कलम ३०३ (२) भान्यासं या गुन्हयातील इसम नामे १) प्रणव रणजित मुजमूले वय २१ वर्ष, रा.सायफळ ता.माहूर जि. नांदेड यास व जप्त ५ मोटार सायकल पुढील तपास कामी पोलीस स्टेशन अवधूतवाडी यवतमाळ यांच्या ताब्यात दिले.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. पियुष जगताप सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोउपनि/शरद लोहकरे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/रमेश राठोड, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोशि/सुनिल पंडागळे, चापोकॉ राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.