ईतर

अखेर अडगळीतील त्या “गधेगळ”शिलालेखाच्या बातमीची पुरातत्व विभागाकडून दखल; ‘झेप’च्या बातमीचा इम्पॅक्ट!अभ्यास करून आव्हाल देणार असल्याची माहिती!

पुसद; शहरातील पूस नदी तीरावर मुखरे बांधाजवळ मध्ययुगीन काळातील ‘गधेगळ’ शिलालेख आढळून आल्याने इतिहास अभ्यासकांच्या भुवया उंचावल्या होत्या ‘झेप’न्युजने बुधवार (ता.८) बातमी प्रकाशित केली होती या बातमीची प्रशासनाकडून तात्काळ दखल घेवुन पुरातत्व विभागाशी पत्रव्यवहार केला त्यावेळी पुरातत्व विभागाकडून दखल घेतली असून तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करून अभ्यास करून आव्हाल देणार असल्याची माहिती आहे.हे झेप’च्या बातमीचा इम्पॅक्ट आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,पूस नदी तीरावरील कुस्ती हौदाजवळ “गधेगळ”शिलालेख कचऱ्यासोबत अडगळीत पडलेला होता. त्याचे छायाचित्र काढून गुगल वरून सर्च केलं असता हा शिलालेख ऐतिहासिक नोंदीनुसार ‘गधेगळ’ असल्याची माहिती मिळाली. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ज्येष्ठ इतिहासकारांनी मिळालेल्या माहितीनुसार हा मध्ययुगीन काळातील हा प्राचीन शिलालेख असावा हा शिलालेख चार फूट उंचीचा असून वरच्या बाजूवर ‘सूर्य’ आणि ‘चंद्र’ यांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. खालच्या भागात समागम करणारे गाढव अस्पष्टपणे दाखवले आहे. मध्ययुगीन शिलालेख केवळ त्यांच्या निर्मितीचा इतिहासच सांगत नाहीत, तर तेव्हाची सामाजिक, राजकीय व आर्थिक स्थितीही कथन करतो. यापैकी एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा म्हणजे हा शिलालेख आहे. दहाव्या शतकात शिलाहार राजांच्या महाराष्ट्रातील राजवटीत हा शिलालेख निर्माण झाला असल्याचे मत आहे.हा गधेगळ शिलालेख केवळ एक लिखित पुरावाच नाही तर, राजाच्या आज्ञेची भीती घालणारा आणि त्याकाळातील महिलांचे सामाजिक स्थान दर्शवणारा एक स्तंभ असल्याचे मानले जाते.या शिलालेखामध्ये लिहिलेली माहिती अथवा आज्ञा जे कोणी पाळणार नाहीत, त्यांच्या सोबत असे कोणते कृत्य केले जाईल, अशी ती धमकी आहे. तर या गधेगळांवर असलेल्या चंद्र आणि सूर्याच्या प्रतिमेबद्दल ‘आ चंद्र, सूर्य नांदो.’, म्हणजे चंद्र आणि सूर्य अस्तित्वात असेपर्यंत ही आज्ञा कायम राहील, म्हणून यावर चंद्र, सूर्य कोरलेले असतात’, असा अन्वयार्थ काढण्यात येतो.गधेगळांवर लिहिलेली राजाज्ञा मोडली तर तुमच्यावर कारवाई करण्याचा संदेश असल्याचे सांगण्यात येते. या संदर्भात माहिती मिळवुन ‘झेप’ न्युज ने बातमी प्रकाशित केली तसेच सर्वच वृत्तपत्रांनी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या त्यावेळी मा.आशिष बिजवल उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ नागपूर येथील पुरातत्त्व विभागाला पत्र देऊन पाहणी करण्यासाठी पाचारण केले. त्यापत्रा नुसार दि.११ मे २०२४ रोजी नागपूर येथील पुरातत्त्व विभागाचे सहायक पुरातत्त्व अभ्यासक श्याम बोरकर यांनी खंड -२ चे तलाठी कामराज चौधरी यांना सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर सगळे पुरावे गोळा करून प्रयोगशाळेकरिता घेऊन गेले आहे.त्यांच्या पाहणीमध्ये तो शिलालेख मध्ययुगीन असून त्याकाळी शहराच्या आत येण्यापुर्वी चारही बाजूची शिव (सीमारेषाची) आठवणीसाठी असावेत असा प्रथमदर्शनिय अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर याप्रकारचे अन्य शिलालेख परिसरात विखुरले असावेत, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.या घटनास्थळी पाहणी केल्यानंतर त्यांनी या भागातील काही हेमाडपंती बांधकाम आहेत का..? अशी माहिती घेतली व येथील काही प्रमुख मंदिराची सुद्धा पाहणी केली. सहाय्यक पुरातत्त्व अभ्यासक बोरकर यांचा अहवाल आल्यानंतरच त्यांची टीम पुन्हा एकदा येणार असल्याची माहिती मिळाली असून आव्हाल आल्यानंतर या शिलालेखाच्या संगोपनाची जबाबदारी स्थानिक नगर परिषदेला दिली जाईल तोपर्यंत या शिलालेखाचे संगोपन करण्याची आवश्यकता इतिहास प्रेमीची आहे. यामुळे इतिहासाचा साक्षीदार असलेला तो अस्सल पुरावा उपेक्षित ठेवण्याऐवजी जतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close