क्राइम

भरधाव ट्रकने दोन पादचाऱी युवकांना चिरडले! एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर; शेंबाळ पिंपरी येथील घटना ;संतप्त नागरिकांकडून रास्तारोको!

पुसद: तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे पुसद हिंगोली मार्गावर दोन पादचरी युवकांना ट्रकने चिरडले त्यात एकजणांचा जागीच मृत्यू झाला तर  एकजण गंभीर जखमी झाला आहे.

या मार्गावरील सतत घडणाऱ्या अपघातामुळे काही मागण्यांसाठी संतप्त नागरिकांकडून तासभर रास्तारोको करण्यात आले असता लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

   याबाबत प्राप्त माहिती अशी की,  काल २२ फेब्रुवारीच्या रात्री अकराचे सुमारास येथील राजरत्न जळबा पाईकराव वय २५ वर्षं व त्याचा मित्र माणिक भिमराव कांबळे वय २४ वर्ष हे गावालगतच्या पुसद हिंगोली मार्गावरुन पायी घराकडे जात असताना समोरून येणाऱ्या एम एच ४३ ई ३४६२ क्रमांकाच्या ट्रकने जबर धडक दिली त्यात राजरत्न आणि माणिक गंभीर जखमी झाले.

तर ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पडला. तात्काळ दोघांनाही पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले असता राजरत्न यास मृत्यू घोषित केले तर माणिकला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मार्गावर सतत घडणाऱ्या अपघातामुळे लोकांच्या भावना भडकल्या आणि दुपारी राजरत्नच्या प्रेतयात्रेसह तासभर संबंधित नातेवाईकाकडून व नागरिकांनी रास्तारोको करण्यात आला. अचानकच्या रास्तारोकोमुळे वाहनांच्या रांगा लागल्या तर बाजारचा दिवस असल्यामुळे मोठी कोंडी निर्माण झाली होती प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. आंदोलनकर्त्यांनी या मार्गावर गतिरोधक, डिवायडर आणि नाली बांधकामाची मागणी केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रकाश झळके, नायब तहसीलदार इंगोले, ठाणेदार देविदास पाटील, सरपंच रविंद्र महल्ले यांच्या उपस्थितीत गतिरोधक आणि नाली बांधकाम करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. आणि तासाभरानंतर संतप्त नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close