ट्रकची महामंडळाच्या एसटी बसला धडक चालक किरकोळ जखमी

पुसद :ते दिग्रस मार्गावरील धुंदी घाटाजवळ एसटी महामंडळाच्या बसला ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात एसटीचालक किरकोळ जखमी झाला. हा अपघात दि. १८ जानेवारी २०२४रोजी १०:०० वाजताच्या सुमारास घडला. निष्काळजीपणाने ट्रक चालविणाऱ्या ट्रक चालकाविरोधात ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,अमरावती आगाराचे एसटी बसचालक रणधीर हिरालाल यादव वय ४२ वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक रामराव गोविंद राठोड वय ४७ वर्ष रा. गहुली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेच्या दिवशी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास अमरावती आगाराची बस अमरावतीवरून पुसदकडे निघाली होती. त्याच दरम्यान ट्रकचालक रामराव राठोड याने ताब्यातील ट्रक क्रमांक एमएच २९, टि ०९६३भरधाव वेगाने व निष्काजीपणाने चालवून एसटीला मागून धडक दिली. या अपघातात बसचालक किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये ट्रक चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत.