ईतर

खंडित अनियमित विजेच्या त्रासामुळे हिवरा संगम परिसरातील बळीराजा भोगतोय मरण यातना: सिंचनाची सोय असताना सुद्धा ओलीत होत नाही!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम) महागाव तालुक्यातील हिवरा संगम परिसरातील हिवरा, संगम, अनंतवाडी, अनंतनगर, थार बु, कासारबेहळ, कवठा, ईजनी, धनोडा, पोहंडूळ , दहिसावळी, तीवरंगसह अनेक गावातील जगाचा पोशिंदा मात्र वीज वितरण कंपनीच्या नाहक त्रासामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या खंडित पुरवठ्यामुळे पूर्णतः खचला असून आहे.

निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना १२तास वीज दिवसा वीज देणार म्हणून सांगणारे विभागाचे आमदार ,खासदार, आता मात्र चुपचाप त्यामुळे विद्युत वितरण कंपनीवर कोणाचाही वचक राहिला नाही हम करो से कायदा धोरण वीज वितरण कंपनी करीत आहे २१ व २२ जुलैला झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असताना सुद्धा अजून पर्यंत एक रुपया सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही खरीपाचे पिकातुन हिरवी स्वप्न भंगल्याने जगण्याच्या जिद्दीने आता रब्बी हंगामाचा तरीआधार मिळेल या आशेवर असणारा जगाचा पोशिंदा तालुक्यातील बळीराजा मात्र रात्र-रात्र भर विद्यूत वितरणाच्या लोडशेडींग व ट्रिपच्या खेळखंडोब्यामुळे हिंसक वन्य प्राणी रानडुक्कर, रोही ,विषारी साप,ईचू , ईंगळी यांच्याशी जिवघेणा खेळ करत आहेत कमी विद्युत दाबामुळे मोटर चालू नसल्याने रात्र भर ढेकळात पडून थंडीत मरण यातना भोगत आहेत.

प्रामुख्याने आता रब्बीतील हरभरा,गहू सह महत्व पुर्ण अशा टरबुज व भाजीपाला पिकांची लागवड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण विभाग मात्र कमी दाबाचा विद्यूत पुरवठा करत असल्याने शेतीवर असणारे विद्यूत मोटार पंप उठून पाणीच फेकत नसल्याने. मोटार न उठता कमी दाबामुळे जळत असल्याने शेतकऱ्यांना वर नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न निर्माण झाल्याची गत आली आहे.विद्युत वितरण कंपनी ऐन हंगामाची नाड पकडून वेठीस तर धरतच असते परंतु दुर्दैवाने जर डीपी मधे काही बिघाड झाला तर मात्र बिल भरून घेतल्या शिवायपिडीत शेतक-यांना विजपुरवठा भेटत नाही. भेटला तर कमीदाबाने येत असल्याने मोटार पंप पाणीच फेकत नाहीत. ज्यामुळे काळ्या मायीच्या पोटात टाकलेले महागडे बियाणे पाण्या विना पोटातच कोमेजून जात असल्याचे विदारक चित्र आज दिसुन येत आहे. तर त्यामुळे जगण्याची हीरवी स्वप्न पाहणारा बळीराजा मात्र रात्री बे रात्रीउशिरा कमी दाबाची रात्र पाळी लोड शेडींग होत असल्याने रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधाराला चिरत जिवघेण्या विषारी सापा सह हिंस्र प्राण्यांशी दोन हात करत जिवघेणा खेळ करावा लागत आहे.  तेव्हा भुतकाळातिल वन्य पशुंच्या शेतकऱ्यांवरिल हल्यांच्या घटना व घडलेल्या दुर्घटना पाहता विद्युत वितरण कंपनीने हिवरा परिसरातील शेतकऱ्यांना लोडशेडींग मुक्त करावे व दिवस पाळीतच भरपुर असा विद्युत पुरवठा देवून शेतकऱ्यांच्या मरण यातना थांबवाव्या अन्यथा शेतकऱ्यांना बिल भरुनही विद्युत पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई पोटी न्यायासाठी  सामुहिक मशाल आंदोलनाचे शासन दरबारी रनशिंग फुंकावे लागेल तेवढे मात्र खरे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close