शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना तात्काळ अटक करा;पुसद आदिवासी कर्मचारी संघटनेची मागणी!

पुसद :नांदेड येथील शासकीय रुग्णालयात खासदार हेमंत पाटील या संविधानिक पदावर असणाऱ्या लोकप्रतिनिधिने उच्चविद्या विभुषीत असणाऱ्या आदिवासी अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांना स्वछतागृह साफ करून घेतले. त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित केला. हेमंत खासदार पाटलावर अट्रॅसिटी गुन्हा दाखल झाला असून त्यांना लवकर अटक करावी यासाठी पुसद उप विभागीय अधिकाऱ्यांमार्फत मा. राज्यपाल यांना पुसद येथील आदिवासी कर्मचारी संघटना, आदिवासी डॉक्टर्स संघटना आणि समाजबांधवांनी निवेदन दिले. त्यांच्यावर आट्रॅसिटी ऍक्ट गुन्हा दाखल होऊनसुद्धा अध्यापपर्यंत अटक केली नाही. त्यांना अटक करून निलंबित करावे अशी मागणी निवेदनातून विचारण्यात आली आहे.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात ३२ रुग्णांचे मृत्यूतांडव उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे. मात्र या प्रकरणात कोण दोषी आहे याची सत्यता पडताळली तर हाफकीन या शासकीय संस्थेने औषधीपूरवठा न पूरवल्यामुळे रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. रुग्णालयात तब्बल ५३ जागा रिक्त आहेत . ५०० रुग्ण उपचार घेतील एवढीच क्षमता रुग्णालयात असूनसुद्धा १२०० च्या वर रुग्ण उपचार घेताहेत. अश्या गंभीर समस्यावर हेमंत पाटील मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना स्वछतागृह साफ करायला लावतील का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री मूग गिळून गप्प का आहेत.सत्तेचा माज असणाऱ्या खासदाराला भविष्यात कोणत्याही आदिवासीनी मतदान करू नये असा पण देखील यावेळी घेण्यात आला.
यावेळी लक्ष्मण टारफे, डॉ हरिभाऊ फुपाटे, ऍड सुनिल ढाले, डॉ. शिवाजी भुरके, डॉ राजेश डाखोरे, नारायण कऱ्हाळे, दिनेश खेकाळे, गणपत गव्हाळे, राजेश घुकसे, गजानन टारफे, राजु गायकवाड, संतोष तडसे, पांडुरंग मुकाडे, सुरेश बोके, संतोष डाखोरे, विजय घावंस, विजय बेले, हनुमान मुकाडे, गजानन कुरकुटे, निकेश गाडगे, दीपक ब्रहणकर, बंडू डाखोरे, एल फोपसे, संतोष गरुळे, प्रशांत गुहाडे, प्रकाश पोटे, संदेश कुरकुटे, दुर्गादास खुपसे, रोहित पाचपुते, योगेश टारफे, सुशांत दुम्हारे सह उपस्थित होते.