ईतर

दादासाहेब मडावी आदिवासी बहुजनातील बुलंद नेते!

यवतमाळ: जिल्ह्रात दिग्रस तालुक्यातील डेहणी या गावी घाम गाळुन रोजमजुरी करणा-या वडील निंबाजी मडावी व आई चंद्रभागा यांच्या पोटी दादासाहेब मडावी यांचा १९४१साली जन्म झाला.झोपडीतला हा तरुण आपल्या दारिद्र्यावर मात करीत जील्हा परिषदेत शिक्षक पदावर रुजु झाला.त्यांच्यातल्या चळवळीने त्यावेळी प्रदेश शिक्षक संघटना स्थापन करण्यासाठी कर्मचारी नेते ओंकार व कडु यांचे सोबत सहभाग घेतला.१९६७,६८च्या दरम्यान ओल्या दुष्काळाने शेतक-यांच्या शेती गवताच्या तणाने भरुन गेल्या.गरीब शेतकरी हताश झाला.त्यावेळेस दादासाहेब मडावी यांनी विद्यार्थ्यांना सोबतीला घेवुन शेतक-यांच्या शेती सामुहीकतेने निंदुन दिल्या.ह्या कार्यक्रमास माजी मुख्यमंञी वसंतरावजी नाईक शेती नींदणा-या शिक्षक व वीद्यार्थ्याचे भेटीसाठी शेतीवर आलेत.सामुहीकपणे विद्यार्थी शेतीतील वाढलेले गवत शेकडोच्या संख्येने निंदुन देत आहेत. ही घटनाच निराळी.सामाजीकतेच्या वेदना जोपासुन त्यांचे जवळ जाणारी माणसच आगळी वेगळी.पुढे वसंतराव नाईकांनी दादासाहेबांना नोकरी सोडायला लावुन सामाजीक कार्य जोमाने करता यावे म्हणुन राजकारणात आनले.नोकरी गेल्यामुळे दादासाहेबावर ऊपासमारीची पाळी आली.यवतमाळ येथे त्यांनी अतिकमणाचे जागेवर झोपडी सारखे घर ऊभारुन सामाजीक सेवेचे कार्य चालविले.केळापुर व राळेगाव मतदार संघात त्यांनी आमदारकीच्या निवडणुका लढविल्या.परंतु पैस्या अभावी त्यांंना लोकप्रियता असूनही अपयश स्वीकारावे लागले.पुढे त्यांना माजी मुख्यमंञी मा.शरद पवार साहेबांनी समाजवादीकाॅंग्रेस पक्षात घेवुन प्रदेश सरचिटणीसपदावर नियुक्त केले.दादासाहेबांनी या पादावरुन गोरगरीब घटकात झुंजार कार्य केले.मोळी वाल्यांचा मोर्चा ,गुराढोरांच्या चा-यासाठीचा गुरांचा मोर्चा लक्ष वेधुन घेणारे ठरले.पौटतिडकीनं सामाजीक भावनेने कार्य करणारे राजकिय नेत्यांचं त्यावेळी त्याच्या कर्तृत्वाचं गुणगाण व्हायचं.नेता किती श्रीमंत आहे ते पाहील्या जात नव्हते.यवतमाळ येथे झोपडीत राहणा-या अतिक्रमनाचे घरी मुख्यमंञी,मंञी,अधिकारी दादासाहेबांचे भेटीला येवु लागले.आदिवासीचा हा नेता प्रसिध्दीच्या झोतात आला.डाॅ.बाबासाहेबांच्या सहवासातील समता सैनिक दलाचे विदर्भाभाचे पदाधिकारी बी.के. आगमे,आदिवासीत गाजलेले शामादादा कोलाम अशी नावाजलेली माणसंही दादासाहेबांच्या झोपडीत येवुन राहु लागली.पुढे दादासाहेब त्यांच्या कर्तुत्वाने यवतमाळ जिल्हा सहकारी बॅंकेचे ऊपाध्यक्ष आणि ईतरही अनेक शासकीय समित्यांचे पदाधीकारी झाले.महाराष्ट्र शासनाने त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान करुन सन्मान केला.लोकांनी त्यावेळेस गावोगावच्या बैलबंडी आणुन खा.जांबुवंतरावजी धोटे यांचे ऊपस्थितीत सत्कार केला.जीवन जगण्यासाठी किटा या खेडेगावातील डोंगर कपारीत ते शेती करु लागले.मुंबई वरुन आलेकी सरळ ते शेतात जावुन राहु लागले.यवतमाळच्या मातीत अतिशय कष्टाने सामाजीक ऊद्येशाने पेटलेला हा राजकिय नेता आपल्या वंचीत कार्यकर्त्यांना सोबत घेवुन आपला आवाज बुलंद करीत राहीला,त्यांच्या जीवनात केवळ संघर्ष होता.आता असे राजकिय नेते दिसुन येत नाहीत. सामाजीकतेने पेटलेल्या या नेतृत्वाची आठवण यवतमाळची माती नोंद घेत राहील काय?आता सामाजीकतेने पेटलेलं नेतृत्व दिसत नाही. दादासाहेबांचे स्मृतिस अभिवादन! बाबाराव मडावी,आकांतकार,यवतमाळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close