ईतर

पुसद तालुक्यातील बेलगव्हाण घाटात पहिल्या जंगल सत्याग्रहाच्या स्मृतींना उजाळा,

पुसद:तालुक्याच्या बेलगव्हण घाटात १९३० साली लोकनायक बापूजी अणे यांनी जंगल सत्याग्रह केला. आज या सत्याग्रहाचा स्मृतिदिन आहे. त्या निमित्याने वनविभाग आणि लोकनायक बापूजी अणे स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील पहिल्या जंगल सत्याग्रहाचा स्मृतींना उजाळा देण्यात आला. ब्रिटिश सरकारचा निषेध म्हणून १० जुलै १९३० रोजी लोकनायक बापूजी अणे यांनी पुसद तालुक्यातील बेलगव्हाण जंगलात लोकनायक बापूजी अणे यांनी निवडक सहकार्यांच्या सोबतीने गवत कापून भारतातील पहिला जंगल सत्याग्रह तालुक्यातील बेलगव्हाण घाटातील जंगलात केला होता. त्या सत्याग्रहाची आठवण म्हणून या जागेवर स्मृती स्थळाची उभारणी करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषदेचे सदस्य आमदार ॲड. निलयभाऊ नाईक हे होते तर व्यासपीठावर वनपरीक्षेत्र अधिकारी प्रवीण राऊत, राजेंद्रजी डांगे, निखिल चिद्दरवार ॲड. गजानन देशमुख हजर होते.प्रथम सर्व मान्यवर व उपस्थितांनी सत्याग्रह स्मारक व बापूजी अणे ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्पांजलीअर्पण केली.या कार्यक्रमाची सुरुवात होताच जंगली मधमाशा धावून आल्या मुळे पुढील कार्यक्रम रद्द करण्यात आला.या
कार्यक्रमाला राजेंद्र डांगे, अमर दिनकर, अमेय नाईक,प्रा.गोफणे , कैलास गावणार, संतोष मुराई, पाटील, निळू पाटील, भारत पाटील, शेखर वानखेडे, रेश्मा लोखंडे, पत्रकार दिनकर गुल्हाने,, रवी देशपांडे, दिपक महाडिक,बापूजी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य क्षीरसागर, डॉ. काकन राजाभाऊ देशमुख, सरनाईक,मुडाणकर, राजू पाटील तथा प्रमोद रायपूरकर तसेच मिलिंद उदेपूरकर,डॉ. नफिस, शेतकरी संघटनेचे मनीष जाधव, बेलगव्हाणचे सरपंच राठोड व गावकरी, श्रीकांत सरनाईक, संभाजी टेटर,जयस्वाल,जयानंद, संजय पाटील, राजू पाटील कान्हेकर,तसेच वनविभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी परविन राऊत व सर्व क्षेत्रपाल, कर्मचारी वृंद, पुसद परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close