पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना!पाझर तलावात बुडून मामा भाच्याचा मृत्यू पंचकोशीत हळहळ

पुसद: तालुक्यातील मंनसळ गावालगत असलेल्या पाझर तलावावर पोहायला गेलेल्या दोंघाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१६) सायकांळी ४:००वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिस गावकऱ्यांनी शोधा शोध केल्यानंतर एकाचा मृतदेह मिळून आला तर रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता दुसरा मृत्यदेह मिळुन आला त्यामध्ये करण सुखदेव यरके(वय ७), रोहिदास रामभाऊ काळीकुटे (वय २५, रा. मंनसळ) अशी पाण्यात बुडालेल्या मामाभाच्याचे नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हे दोघे गावालगत असलेल्या टाळीकुटे यांच्या शेताच्या शेजारी पाझर तळ्यावर दोन चिमुकले भाऊ एक सात वर्षाचा व एक सहा वर्षाचा पोहण्यास गेले. त्यापैकी करण हा पाझर तलावाच्या काठावर बसला असतानां अर्जून पोहण्यासाठी पाण्यात उतरला परंतु त्याला पाण्याच्या अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाला, बराच वेळ झाल्याने तो बाहेर येत नसल्यामुळे उभा असलेल्या चिमुकल्या भावाने ती माहिती त्याच्या आई व मामाकडे सांगितली त्यानंतर मामा रोहिदास यांने यांनी पाझर तलवात उडी घेऊन शोधण्याचा प्रयत्न केला असता त्याचाही पाण्यात बुडून गुदमरून मृत्यू झाला ही माहिती वाऱ्यासारखी परिसरातील नागरिकांना व नातेवाईकांना कळाली त्यानंतर घटनास्थळी गावातील नागरिकांनी धाव घेतली व शोधा शोध सुरू केली असता चिमुकल्याचा मृतदेह मिळाला परंतु दुसऱ्याचा शोध लागत नव्हता या घटनेची माहिती तहसील प्रशासनाला मिळताच शोध कार्याची गती वाढवली त्यावेळी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास मामाचा मृतदेह सोधण्यात शोधपथाकाला उशिरापर्यंत यश आले. सदर घटनेचा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी पंचनामा करून मामाभाच्याचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे दाखल करण्यात आले.तर आज सकाळी १०ते११वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.एकाच दिवशी मामाभाच्याचा जीव गेल्याने पंचकोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेचा आवाहल तहसीलदार महादेव जोरवर व नायाब तहसीलदार जी.एन.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी गोपल भोरे,शासनाकडे पाठविला आहे.विषेश म्हणजे सहा ते सात महिन्यापूर्वी करणचा वडील सुखदेवने मानसिक त्रासाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली होती.