तरुण शेतकऱ्याची विष प्रशासन करून आत्महत्या!

मारेगाव / प्रतिनिधी : मारेगाव तालुक्यातील मुकटा या गावातील प्रफुल उत्तम तुराणकर (२८) असे विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या युवकाने काल शुक्रवारी २६ मे च्या सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास विष प्राशन केले. त्याला तातडीने चंद्रपूर येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले होते, कालपासून त्याच्यावर उपचार सुरु असताना आज उपचारादरम्यान सकाळी ६:००वाजताचे दरम्यान, त्याने अखेरचा श्वास घेतला. प्रफुल हा पुणे येथील एका खासगी कंपनीमध्ये काम करीत होता. गेल्या काही दिवसापासून तो नुकताच मुकटा येथे घरी आला होता. काल दि. २६मे ला पुणे येथे परत जाणार होता. त्यामुळे आई त्यांचेसाठी डब्बा तयार करत होती तर वडील जनावरांना चारापाणी करायला गेले असताना प्रफुलने घरी असलेली विषारी द्रव्य प्राशन केले. एवढ्यात त्याला उलटी झाली या उलटीतून वास आल्याचे आईच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ वडिलांना बोलावून प्रफुलला चंद्रपूर येथील खाजगी दवाखाण्यात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. त्याचा मृतदेह चंद्रपूर येथून मूकटा येथे जन्मगावी आणवून येथेच त्याचा अंतसंस्कार करण्यात आला आहे. प्रफुलच्या मागे आईवडील, दोन भाऊ आणि आप्तपरिवार आहे.