५२ पत्त्यांचा डाव खेळणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांची धाड ;१,९६,१००रुपयाचा मुद्देमाल जप्त!

पुसद: शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आश्विनपुर (वरुड ) येथे अवैधरित्या ५२ पत्ती जुगार खेळणाऱ्यांवर छापा कारवाई करुन १,९६,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची मोठी कारवाई करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हें आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत. दि.२४जुलै२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना शहर पोलीस स्टेशन पुसदच्या हद्दीत मौजे अश्विनपुर (वरुड) येथील शामराव सवई चव्हाण यांचे घराचे समोरील पोर्च मधील खुल्या जागेत काही लोक एकत्रीत गोल रिंगन करुन मध्यभागी पैसे लावून एक्का बादशहा नावाचा ५२ पत्ते जुगार खेळ खेळवित आहे अशी मुखवीरव्दारे खात्रीशिर माहीती मिळाल्याने नमूद खालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचासमक्ष छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी १) रविंद्र गणपत राठोड वय ४० रा. सावंगी ता. पुसद, २) तारासिंग भिका राठोड वय ५५ वर्षे, रा. अश्वीनपुर ता. पुसद, ३) अरविंद रामदास पवार वय ५८ वर्षे, रा. नंदपुर (मोहा), ४) मधुकर धर्मा राठोड वय ५९ रा. रामनगर (मोहा), ५) संतोष शंकर राठोड वय ४० रा. मोहा, ६) प्रकाश चरण राठोड वय ३७ रा. वरुड ता. पुसद, ७) साहेबराव रामराव देशमुख वय ५० रा. वरुड, ८) शामराव सवई चव्हाण वय ४२ रा. अश्वीनपुर ता. पुसद असे ५२ पत्त्यांचा हारजितचा जुगार खेळ खेळत असतांना मिळून आल्याने सदर ठिकाणा वरुन ४ मोटार सायकल, ६ मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १,९६,१०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन नमुद ८ इसमांविरुध्द पोलीस स्टेशन पुसद शहर येथे जुगार कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.सदरची कार्यवाही ही डॉ. पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, आधारसिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि अमोल सांगळे, सपोनि, गजानन गजभारे, पोहवा तेजाब रंणखांब, पोहवा सुभाष जाधव, नापोकों कुणाल मुंडोकार, नापोका सोहेल मिर्झा, नापोकॉ पंकज पातुरकर, पोशि सुनिल पंडागळे, मोहम्मद ताज, दिंगबर गिते सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



