आदर्श गाव खडका येथील ग्रामपंचायतची ५० वर्षाची बिनविरोध निवडणूक परंपरा कायम!

महागाव/प्रतिनिधी ( संदीप कदम):-महागाव तालुक्यातील आदर्श व अनेक पुरस्कार प्राप्त गाव म्हणून खडका गावाकडे पाहिल्या जाते येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा मागील कार्यकाळ संपला व नवीन ग्रामपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक लागल्यामुळे येथील जेष्ठ नागरिकांची व गावकऱ्यांची सभा चावडीवर घेण्यात आली.
या सभेमध्ये मागील ५० वर्षाची बिनविरोधची परंपरा आजही कायम ठेवत नवीन सरपंच ,उपसरपंच व सदस्य यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी बाबुराव देशमुख ३ वेळा , डॉ.राजेंद्र पुरोहित, मिराबाई देशमुख, विद्याबाई साळसुंदर, पंजाबराव देशमुख, प्रकाश जमदाडे, संदीप कानडे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड झाली होती.आज सरपंचा सौ कमलबाई अरुणराव देशमुख ,उपसरपंच दत्तराव आत्माराम कदम, सदस्य सौ प्रगती रवींद्र हनवते , सौ विद्या दीपक साळसुंदर , पांडुरंग मारुती गायकवाड , संतोष मैनाजी भालेराव ,सौ ऊषा राजेंद्र ठाकरे, सौ.पूजा गजानन देशमुख यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व गावकऱ्यांनी या नूतन सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विजयराव देशमुख, राजेंद्र पुरोहित, रितेश पुरोहित, पंजाबराव देशमुख खडकेकर, प्रकाशराव देशमुख, आनंदराव देशमुख, उत्तमराव देशमुख, बळवंतराव चवरे, नितीन ठोके, शंकर खडसे, गणेश भामकर, साहेबराव देशमुख, संदीप कानडे, डॉ. संदीप शिंदे, चंद्रकांत देशमुख, प्रमोद कदम यांच्यासह खूप मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते खडका गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटी, शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्त गाव समिती, यांच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड सुद्धा बिनविरोध करण्यात येते.



