ट्रकच्या धडकेत३२वर्षीय इसमाचा मृत्यू; पुसद शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसद : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बारा चाकी ट्रकने जबर धडक दिल्याने ३२ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २ जुलै रोजी सकाळी काळी अंदाजे ९ :०० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.सतीश नारायण जाधव वय ३२ वर्ष रा. छत्रपती शिवाजी वार्ड पुसद असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकांचे नांव आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की, सतीश हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन नेताजी सुभाषचंद्र बोस चौककडे जात असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाशि लॉजजवळ बारा चाकी ट्रक क्रमांक एमएच २९ टी – २२ ८८ ची अचानक जबर धडक दिली या धडकेत सतीश याच्या छातीला तसेच – डोक्याला जबर मार लागला व उजवा हात – तुटला. घटनास्थळी असलेल्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्यास उचलून एका – खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यास यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. सद्यस्थितीत मय्यत सतीश नारायण जाधव यांचा मृतदेह पुसद येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदना करिता आणण्यात आला आहे. मृतकाच्या भावांने पुसद शहर पोलीस स्टेशन येथे ट्रक चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली असून शहर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.मय्यत सतीश याच्या पश्चात दोन – लहान भाऊ एक बहीण आणि आई- वडील असा आप्त परिवार आहे. घरातल्या मोठ्या मुलाचे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने या कुटुंबांवर दुखःचा डोंगर कोसळा असुन परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



