पुसद शहरात विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात निघालेली श्रिरामनवमीची शोभायात्रा “न भूतो न भविष्यती”विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्याची पत्रकार परिषदेत माहिती..

पुसद: शहरात यावर्षी श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर, विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात निघालेली श्रिरामनवमीची भव्यदिव्य शोभायात्रा “न भूतो न भविष्यती”असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल दीपसंध्या येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
याबाबत नुकतीच पुसद शहरातील हॉटेल दीप संध्या येथे विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदा आयोजित केली होती त्यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी बोलताना म्हणाले की, पुसद शहरात सन २००९मध्ये रामनवमीच्या दिवशी या शोभायात्रेला गालबोट लागले होते त्यावेळी काही समाजकंटक जमावाने तोडफोड केली आणि दुकाने, तसेच वाहनांवर हल्ले केले. दगडफेक करीत पोलीसांना ही लक्ष्य करण्यात आले होते या व रामनवमीच्या मिरवणुकीवर हल्ला झाला होता. आणि दगडफेकही झाली होती. त्यानंतर दोन धर्मांतील लोकांनी एकमेकांवर हिंसाचाराला जबाबदार असल्याचा आरोप केला होता त्यावेळी पोलिसांनी दहा दिवसांच्या अधिक काळ संचार बंदी लागू केली होती व पुसद शहरातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी फार मोठा अवधी लागला होता. त्याची सल अजूनही नागरीकांच्या व भाविकांच्या मनात आहे. परंतु ज्या ज्या वेळी असे हिंदूचे धार्मिक सण उत्सव कार्यक्रम असतात त्यावेळी पोलीस प्रशासन मात्र जाणीवपूर्वक अशा दुर्दैवी घटनेची आठवण करून देतात पण जनतेने या घटनेचा इतिहास मिटवायचा नसतो तर त्यातून बोध घ्यायचा असतो परंतु आम्हाला नेहमी त्या जुन्या घटनेची आठवण करून दिली जाते. मात्र यावर्षी विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात प्रभू श्रीरामजन्मोत्सवा निमित्त काढण्यात आलेली शोभायात्रा ‘न भुतो न भविष्यती’मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीचे हजारो रामभक्तांनी प्रभू श्रीरामचंद्रचा जयघोष करत स्वागत केले. मिरवणुकीत हजारो युवा श्रीराम भक्तांचा सहभाग हे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते.
महाकाल अघोरी तांडव नृत्य प्रयोग हा जिवंत देखावा पाण्यासाठी आबालवृद्ध बाल गोपाळांसह महिलांची शहर व तालुक्यातून अफाट गर्दी झाली होती.विश्व हिंदू परिषद च्या मार्गदर्शनात न भूतो अशी श्रीराम नवमी २०२५ ला आपल्या पुसद नगरीमध्ये उत्साहात संपन्न झाली.
मागील एक महिन्यापासून विश्व हिंदू परिषद चे सर्व कार्यकर्ते, बजरंग दल चे सर्व बजरंगी बांधव,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व धारकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, असंख्य रामभकांनी,विशेष करून दुर्गवाहिणीच्या आणि इतर सामाजिक संघटनांच्या महिलांनी मेहनत घेऊन हिंदूचे एकत्रीकरण करण्याचे जे प्रयत्न केले त्याचे फलित आपल्याला ६ एप्रिल रोजी निघालेल्या भव्य दिव्यअशी शोभायात्रेतुन दिसुन आले.
यावेळेस संपूर्ण गावच नव्हे तर संपूर्ण तालुका भगवा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पताक्याचे जाहीर वितरण करण्यात आले, एचडीएफसी बँकेच्या वर सुंदर अश्या वास्तूत मोठ्या उत्साहात श्रीराम जन्मोत्सव चे कार्यालय चे उदघाटन दि १३ मार्च २०२५ रोजीकरण्यात आले,दि ४ मार्च २०२५ रोजी सकाळी स्व. वसंतराव नाईक चौक येथे सार्वजनिक गुढी उभारुन गुढी पाडव्याच्या उत्सव साजरा करण्यात आला व सायंकाळी दत्त मंदिर येथून संपुर्ण गावातून महिलांची व पुरुषांची भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली, दि ३१ मार्च पासुन तर ६ एप्रिल पर्यंत राम मंदिरहटकेश्वर वॉर्ड येथे दररोज सायंकाळी भजन, कीर्तन, सुंदरकांड व महाआरतीचे नियोजन करण्यात आले.दि. रविवार दि.६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजता श्रीराम यांचा जन्मोत्सव साजरा करून दुपारी ३ वाजता भव्यदिव्य अश्या शोभायात्रीची सुरुवात झाली,

त्यात सर्वप्रथम रामराज्य ढोल पथक,चित्त थरारक मर्दानी पथक, वाशिम येथील भजनी मंडळ, भारत मातेची झाकी, प्रभू श्रीरामाची पालखी,दुर्गा वाहिनीच्या महिलांचा लाठीकाठी, पावली नृत्य, तलवारबाजी व लेशीम पथक, राम मंदिर ची भव्य झाकी,अयोध्या येथील श्री रामललाची मूर्ती ची झाकी, श्री राम दरवार झाकी, महाकुंभ ची झांकी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिवंत देखावा, आदिवासी नृत्य पथक, बिरसा मुंडा यांची झांकी, बंजारा लेंगी नृत्य, डफडा वादन,संत सेवालाल महाराज यांची झांकी, अहिल्यादेवी होळकर ज्यांनी काशी चा जीणोंद्धार केलं.
त्यांची झांकी,वस्ताद लहुजी साळवे यांची झांकी, महाकाल ची झाकी, भव्य महादेव यांची मुर्ती, संभाजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता त्यांचं भव्य स्मारक ची झाकी, रायगड येथील ३२ मण सुवर्ण सिंहासनाची झांकी
व छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य अशी अश्वारूढ पुतळ्याची झांकी, अनेक बँड, वाद्य व मंगलवाद्य या शोभयात्रेचे प्रमुख आकर्षण होते समाजात समरसता व्हावी त्याकरिता अनेक महापुरुषांच्या झाक्या या शुभयात्रेचे मुख्य आकर्षण करण्यात आले होते, या सर्व कार्यक्रमाचे लाईव्ह स्क्रीनिंग शहरात चार प्रमुख ठिकाणी करण्यात आले होते.
सर्व समाजाचे प्रतिनिधी या शोभायात्रेत मोठ्या संख्येत सहभागी झाले होते हे विशेष प्रभू श्रीराम मंदिर येथून निघालेल्या या भव्य शुभ यात्रेची सांगता गजानन महाराज मंदिर येथे महाआरती व प्रसाद वाटप करून झाली सर्व देणगीदार ज्यांनी आम्हाला भरघोस निधी उपलब्ध करुन दिला त्यांचेही आभार मानले.
येत्या काही दिवसातच झालेल्या खर्चाची माहिती देणार असल्याचे सांगितले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन,गजानन महाराज संस्थान, श्रीराम मंदिर, सर्व धार्मिक व सामाजिक संघटन व प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकाराची तसेच राम भक्ताचे विश्व हिंदु परिषदेच्या वतीने आभार मानले.सन२००९ नंतर झालेली रामजन्मोत्सव निमित्त निघालेली शोभायात्रा ही विश्व हिंदू परिषदेच्या पदधिकाऱ्याचे मेहनतीचे फळ असून यापुढेही विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हिंदू समाजासाठी धार्मिक कार्य केले जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. सर्व भाविकांचे विश्व हिंदू परिषदे च्या पदाधिकाऱ्याच्या वतीने आभार मानले असून भविष्यात श्रिरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्याकरिता सर्वांनी सहकार्य करावे असे आव्हान केले आहे.



