तिच्यावर.. प्रेम.. तिचाच..खून.. नवऱ्याने ओढणीने गळा आवळून केला खून;पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसद : शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एका लॉजमध्ये पत्नीची ओढणीच्या साह्याने गळा आवळून खून करण्यात आला आरोपी त्या तरुणीला मृत अवस्थेत विवस्त्र सोडून फरार झाला ही खळबळजनक घटना शुक्रवार ता.७ जुन२०२४ रोजी सायंकाळी उघडकीस आली.
सौ.सपना संजय मोरे (वय २३ रा.निंबी ह.मु. बोरगडी) असे मय्यत तरुणीचे नाव आहे. 
याप्रकरणी पुसद शहर पोलिसांनी आरोपी पती संजय प्रदीप मोरे (वय २५ वर्षे रा.निंबी ) याला अटक केली. ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचे पोलिसांनी सांगितले. 
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,सपना व संजयचा तिन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. परंतु या प्रेमविवाहास मुलीकडच्या मंडळीचा विरोध असल्याने व मान्यता न मिळाल्याने ता.११ मे २०२२ रोजी त्यांनी सम्राट अशोक बुद्ध विहार दारव्हा येथे पुन्हा विवाह केला परंतु काही दिवसांपासून एकमेकांमध्ये वाद होत असल्याने सपना ही माहेरी आई वडिलांकडे बोरगडी येथे वास्तव्यास होती. तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता ते प्रकरण पुसद कोर्टात सुरूही होते तरीही आरोपीच्या संपर्कात होती. अशातच आरोपी संजय व सपना हे दोघे ता. ७ जून २०२४रोजी दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास शनी मंदिरा परिसरातील हॉटेल सनी प्राइड या लॉजमधिल रुं.नं.१०८मध्ये थांबले होते. त्यावेळी त्या दोघात पुन्हा वाद निर्माण झाला असावा या वादातून जिच्यावर प्रेम केले तिचाच ओढणीच्या साह्याने गळा आवळून खून करून आरोपी पसार झाला.पंरतु सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लाजचे संचालक प्रशिक देवेंद्र खडशे यांनी आवाज दिला असता रुममधुन प्रतिसाद मिळात नसल्याने त्यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर तसेच एपिआय धिरज बांडे पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता ती महीलाचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत दिसून आला ही घटना सायंकाळी उघडकीस आली. या घटनेची फिर्याद मय्यताचे वडील लक्ष्मण गणपत पाईकराव वय ५८वर्ष रा.बोरगडी यांनी शहर पोलीस स्टेशन पुसद येथे दिली आहे. पोलीसांनी तात्काळ पंचनामा केला असून मृतदेह उपजिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठविण्यात आला. तर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक धीरज बांडे यांच्या मार्गदर्शनात आरोपी शोधकार्यासाठी पथके रवाना केली त्यावेळी पोलिसांच्या पथकाने आरोपीचा कसून शोध घेतला असता निंबी शिवारात दबा धरून बसलेल्या आरोपी पती संजय प्रदीप मोरे याला जेरबंद करण्यात पोलिसांनी यश आले. आरोपीची कसून चौकशी केली असता तो पोपटासारखा बोलू लागला व त्यांनी गुन्हा कबूल केला असून आरोपी पती संजय प्रदीप मोरे विरुद्ध शहर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रं .३७९/२०२४ अंतर्गत ३०२ गुन्हा दाखल केला आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड, सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस कॉन्स्टेबल उंचेकर, गोपनीय पोलीस कॉन्स्टेबल विभागाचे नितेश भालेराव, डीबीचे पोलीस कर्मचारी अधिकारी शुद्धोधन भगत, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल आशिष राठोड यांच्यासह सीनियर पोलीस कॉन्स्टेबल रमेश राठोड यांनी कामगिरी पार पाडली आहे. सदर घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहे.



