क्राइम

विश्वकर्मा लॉजच्या मालकासह कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणी; पत्नीची शहर पोलीस ठाण्यात तक्रार;विश्वकर्मा लाजमध्ये सडलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह 

विश्वकर्मा लॉजच्या मालकासह

पुसद: सुमारे ३९ दिवसांपूर्वी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या विश्वकर्मा लॉजमध्ये महागाव तालुक्यातील साई (इ) येथे राहणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यूदेह आढळला होता.यामुळे एकच खळबळ उडाली होती.लॉजच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह आढळल्याची माहिती शहर ठाण्यात दिली.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.पंचनामा अंती शहर पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल केला होता.परंतु त्या व्यक्तीने आत्महत्या केली नसून हत्या केल्याचा आरोप मृतकाच्या पत्नीने लावला आहे.तशी तक्रारच शहर पोलीस स्टेशनमध्ये दि.१५ जुलै २०३ रोजी दिली आहे.त्या तक्रारीत विश्वकर्मा लॉजच्या मालकासह कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.
महागाव तालुक्यातील साई इ येथे राहणाऱ्या पंजाब उत्तम जाधव या व्यक्तीचा मृत्यूदेह आढळला होता.महागाव तालुक्यातील साई (इ) येथे राहणाऱ्या सुरेखा पंजाब जाधव यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, महागाव तालुक्यातील साई (इ) येथे राहणारे पंजाब हे दि.५जून २०२३ रोजी कामानिमित्त आले होते.त्यानंतर ते दि. ५ जून २०२३ ते दि.७ जून २०२३ पर्यंत घरी परतले नाही.त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध घेणे सुरू केले असता दि.७जून २०२३ रोजी शहर पोलीस ठाण्यातून फोन आला.फोन करून पोलिसांनी मृतकाची पत्नी सुरेखाला उपजिल्हा रुग्णालयात बोलावले.त्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता उपजिल्हा रुग्णालय गाठले व पोलिसांची संपर्क साधला. त्यानंतर शहर पोलिसांनी पंजाबचे शव दाखविले व पोलिसांनी घटनास्थळी काढलेले मोबाईल मधील फोटो दाखविले. पोलीसांनी पंजाब ने विषप्राशन केल्यामुळे त्यांचा मृत्यु झाला.त्यांनी आत्महत्या केली असे मृतकाच्या पत्नीला सांगण्यात आले.शहर पोलीसांनी पंजाब चे शव अंत्यसंस्कारासाठी ताब्यात दिले.मात्र मृतकाची पत्नी सुरेखा यांनी पंजाब यांनी आत्महत्या केली नसून हत्या केल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे.

काय घडला होता नेमका प्रकार

मृतक पंजाब हे विश्वकर्मा लॉजमधील एका रूम मध्ये राहत होते.दि.७ जून २०२३ रोजी कर्मचारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान काउन्टरवर बसून असतांना लॉज मधील एका ग्राहकाने त्याला येवून सांगीतले की, लॉज मधील शौचालयात काही तरी मृत झाल्याने सडल्या सारखी दुर्गंधी येत असल्याची माहिती दिली.त्यानंतर कर्मचाऱ्यांनी शौचालयातील आतुन बंद असणारा दरवाजा मागेपुढे करून उघडला.त्यांना शौचालयात पंजाब हे खाली बसलेले व समोरच्या भिंतीकडे झुकलेला मृत अवस्थेत आढळून आले.त्यांच्याकडे एका कृषी केंद्रच्या दुकानाच्या नावाचे विषारी औषध असलेले बिल सापडले.त्या बिलावर पंजाबचे नाव लिहून होते.त्यावर एक विषारी औषधाची बॉटल शौचालयात मिळून आली.त्या सर्व दिसत्या परिस्थितीवरून पोलीसांनी आत्महत्या केली असा निष्कर्ष काढून पुढील तपास बंद केला.सदर घटने बाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये नमुद पंजाबचा मृत्यु विश्वकर्मा लॉज २४ ते ४८ घंटे पूर्वी झाला होता, म्हणून त्याच्या प्रेताची दुर्गंधी येत होती.

लॉजच्या रजिस्टरमध्ये मयताचे नावाच नाह

मयत पंजाब हे सबंधीत लॉजमध्ये रूम भाडयाने करून राहीले असते तर ते स्वाभावीकच खान्यापिण्याकरीता लॉज मधील कर्मचाऱ्यांना सांगत होते.अथवा स्वता लॉजच्या बाहेर जावून खान्यापिण्याकरीता नेत होते.यात धक्कादायक बाब म्हणजे सबंधीत लॉजच्या नोंद रजिस्टरमध्ये मयत पंजाब च्या नावाने कोणतीही रूम बुक नाही किंवा त्याचे येण्या-जाण्याची नोंद नाही.सर्व बाबी मयत पंजाबचा घातपात झाला असल्याबाबत मृतकाचे पत्नी सुरेखा यांच्या निदर्शनास आले आहे.तसेच मयत पंजाब ने घटनेच्या दोन दिवस पुर्वी महागावच्या युनियन बॅक ऑफ इंडिया शाखांमधून येथुन ७० हजार रुपये काढले होते.ते घटनेपुर्वी दोन दिवसापासुन घरी आला नाही. तसेच त्यांना कोणतीही शारिरीक व्याधीने ग्रस्त नव्हती व त्याला कोणताही मानसिक तणाव नव्हता.त्यांनी आत्महत्या करून जिवने संपण्याकरीता कोणतेही वैयक्तिक अथवा कौटुंबीक कारण नव्हते,असा दावा मृतकाच्या पत्नीने केला आहे.या सर्व बाजूची चौकशी करून पंजाब चा घातपात झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून विश्वकर्मा लॉजच्या मालक तसेच तिथे काम करणारे सर्व कर्मचारी यांच्या विरूध्द फौजदारी कारवाई करण्याची मागणी करून न्याय मिळवून देण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.

पोलीसांनी तपासणी न करताच फाईल केली बंद

लॉजमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेह प्रकरणात लॉज संचालकावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.लॉजमध्ये लोकांची ये जा करताना गर्दी असते.त्या लॉजमधील एका रूमच्या शौचालयात तीन दिवस मृतदेह तसा राहतो व त्याच्या दुर्गंधीमुळे त्याची माहिती होते.त्या प्रकाराने लॉज संचालक व तेथील कर्मचाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाही पोलिसांनी मात्र तपास बंद केल्याचे समजते.

अवैध व्यवसायाला शहरातील लॉजमध्ये मिळतो थारा

पुसद शहरातील शेकडो लॉज आहेत. त्यातील बहुतांश लॉजमध्ये पत्ते,जुगार मोलमजुरांना किडनॅपिंगचे प्रकार, लॉजमध्ये कोंबून ठेवण्याचे प्रकार,ऊसतोड ठेकेदाराचे गैरव्यवहाराचे अड्डे बनले आहे.सोबतच बऱ्याच लॉजमध्ये महिलां मुलींसोबतचे अश्लील चाळे करण्यासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून गैरवापर होत आहे.त्या लॉजिंग मधील गैर व्यवहारामुळे लॉजिंग व्यवसायाला मोठे स्वरूप आले असले तरी त्या ठिकाणी होणाऱ्या कायद्याच्या पायमल्लीवर कोणीही कारवाई करायला किंवा तपासणी करायला अधिकारी धजावत नाहीत.त्यामुळे शहरातील लॉजिंगच्या अवैध व्यवसायातून इतर घटना घडण्यापूर्वी आवर घालण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी पावले उचलण्याची गरज आहे.

पंजाबच्या शरीरावर रक्ताच्या धारा

शिवाजी चौकातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या विश्वकर्मा लॉजमध्ये मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.त्यावेळी त्यांचा मृतदेह रक्ताने माखलेला होता.असे असतानाही पोलिसांनी आत्महत्येचे प्रकरण दाखवल्याने मृतकाच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

डॉक्टरांचा अहवाल आल्यावरच पुढील तपास करता येईल

महागाव तालुक्यातील साई (इ) येथे राहणारे पंजाब यांचा मृतदेह लॉज मधील एका रूमच्या शौचालयात आढळून आला होता. त्या मृतदेहाच्या शरीरावर व आजूबाजूला पाणी असल्यामुळे त्यांचे शरीर फुगले होते.पंचनामामध्ये मृतदेहाच्या बाजूला विषयाची बॉटल आढळली होती.त्यामुळे त्यांना मारहाण झाली व तक्रारदारांनी केलेल्या आरोपाची चौकशी केली जाईल.तक्रारीतील केलेल्या आरोप हा चौकशीचा भाग असून प्रकरण न्यायालयात सादर झाल्यावर न्यायालयाला तसे उत्तर द्यावे लागेल.त्यामुळे महिलेने केलेल्या आरोपाची चौकशी केली जाईल.यात विशेष करून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.त्या शवविच्छेदनाचा अहवाल संबंधित डॉक्टरांना पाठविण्यात आला आहे.तो अहवाल आल्यावरच पुढील कारवाई करण्यात येईल.डॉक्टरांनी सादर केलेल्या अहवालावरच सर्व अवलंबून आहे-अनिल सावळे, तपास अधिकारी,शहर पोलीस स्टेशन पुसद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close