रिपाई(आठवले ) कामगार आघाडी जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण कांबळे यांची नियुक्ती

पुसद/प्रतिनिधी :रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांच्या आदेशानुसार आज दि.२८ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय विश्रामगृहावर रिपब्लिकन ऑफ इंडिया कामगार आघाडीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली.
सदर बैठकीस कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप भाऊ कांबळे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे,मराठवाडा अध्यक्ष कामगार आघाडी कैलास निकाळजे, तसेच हिंगोली, सोलापूर, औरंगाबाद, जालना येथील जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते.
याप्रसंगी बैठकीत पुसद येथील सामाजिक कार्येकर्ते तथा रिपाइं आठवले पक्षाचे लक्ष्मण कांबळे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यवतमाळ जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष पद नियुक्ती करून त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित प्रा. अंबादास वानखेडे, दिनेश खांडेकर व रिपाई पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश धुळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील नौकरदार, मंजुर,कामगारांच्या, कर्मचारी यांच्या समस्याना वाचा फोडण्यासाठी आपण कटिबद्ध असून केंद्र व राज्य सरकारच्या कामगार हितार्थ योजनांतून कामगारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास यथावकाशपणे प्रयत्न करणार असल्याचे मत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी बोलताना व्यक्त केले.