श्री. शिवाजी विद्यालयाचा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
* *सेमी ईंग्रजी माध्यमाचा निकाल ९९ टक्के*
पुसद —,
. मार्च- २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन घोषित करण्यात आला. त्यामधे स्थानिक श्री. शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुसद ने आपल्या उत्कृष्ट निकालाची उज्वल परंपरा याही वर्षी कायम ठेवली असून विद्यालयाचा निकाल ९३.४६ टक्के लागला तर सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल ९९ टक्के लागला आहे. यामध्ये वेदांत लक्ष्मीकांत चौधरी ९४.६० टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातुन प्रथम आला आहे. तर ज्ञानेश्वर राजेश तंवर ९०.४० टक्के गुण मिळवून द्वितीय व कु. ॠतुजा गजानन जाभळूनकर ९०.२० टक्के गुण मिळवून तृतिय आली आहे. परिक्षेला एकूण ३०६ विद्यार्थ्यी बसले होते त्यापैकी २८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये ६३ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली असुन प्रथम श्रेणीत १०८ तर द्वितीय श्रेणीत ७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यात वेदांत लक्ष्मीकांत चौधरी ९४.६० टक्के, ज्ञानेश्वर राजेश तंवर ९०.४० टक्के, कु. रूतुजा गजानन जांभळूनकर ९०.२० टक्के, कु. वेदिका संदिप ठाकरे ९० टक्के, कु. राधिका शंकर चौतमल ८९.६० टक्के, कु.भुमिका रंजन चव्हाण ८९.४० टक्के, कु. प्रतिक्षा गणेश चव्हाण ८९.४० टक्के, कु. श्रावणी नानासाहेब देशमुख ८८.६० टक्के, ओम दिलीप चौधरी ८८ टक्के, पृथ्वी संतोष कवळकर ८७.८० टक्के , कु. आकांक्षा संतोष अंभोरे ८७.६० टक्के, कु. सृष्टी प्रमोद चव्हाण ८७.६० टक्के, कु. अनुजा शंकर शिंदे ८६.६० टक्के, रूपेश मानिक चव्हाण ८६.४० टक्के, सिध्देश्वर गजानन मते ८६.४०टक्के, कु. श्रृती गजानन रेनापुरकर ८५.८० टक्के, कु. नियती संजय थोरात ८५.८० टक्के, कु. ईश्वरी अशोक चौधरी ८५.२० टक्के हे सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यी आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल श्री. शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष अनिरूध्द पाटील चोंढीकर व सचिव अश्विनीताई पाटील चोंढीकर यांनी अभिनंदन करून विद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाबद्ल समाधान व्यक्त केले.
मुख्याध्यापक विजय उंचेकर, पर्यवेक्षक रामचंद्र हिरवे तथा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शूभेच्छा दिल्या. पालकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी व आपल्या पाल्याला उत्कृष्ट आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मत मुख्याध्यापक विजय उंचेकर यांनी निकाला दरम्यान व्यक्त केले.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️