क्राइम

वसंतनगर पो.स्टे.हद्दीत धारधार शस्त्रासह एकास अटक: स्थागुशा यवतमाळची कारवाई!

पुसद: वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मधुकर नगर येथे दुरेश शंकर कांबळे, हा त्याचे घरात सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करून दखलपात्र गुन्हा करण्याचे इरादयाने लोखडी धारधार तलवार बाळगून असल्याचीअशी मुखबिरव्दारे खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या अधिस्थान पथकांने तात्काळ छापा टाकून एकास धारधार शस्त्रासह (तलवार ) एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस स्टेशन हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यानी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते.त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या त्यानुसार दि.२५जुलै२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना पोलीस स्टेशन वसंतनगर हद्दीतील मौजे मधुकरनगर येथील इसम नामे दुरेश शंकर कांबळे, हा त्याचे घरात सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करून दखलपात्र गुन्हा करण्याचे इरादयाने लोखडी धारधार तलवार बाळगून आहे अशी मुखबिरव्दारे खात्रीशिर माहीती मिळाल्याने स्वागुशा कडील पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठून माहिती प्रमाणे इसमाची घराची झडती घेतली असता त्याचे घरातून एक धारधार तलवार मिळून आल्याने इसम नामे दुरेश शंकर कांबळे वय २५ वर्षे, रा.मधुकर नगर ता.पुसद जि. यवतमाळ यास ताब्यात घेवून त्याचे विरुध्द वसंतनगर पोलीस स्टेशन येथे आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यातआला आहे.सदरची कार्यवाही डॉ.पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, आधारसिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, स्वा.गु.शा. यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि अमोल सांगळे सपोनि गजानन गजभारे पोहवा तेजाव रंणखांब, पोहवा सुभाष जाधव, नापोको कुणाल मुंडोकार, नापोको सोहल मिर्झा, नापोको पंकज पातूरकर, पोशि सुनिल पंडागळे, मोहम्मद ताज, दिंगबर गिते सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close