ईतर

वसंत नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गावठी कट्टा बाळगणारा अटकेत!

पुसद :   पोलीस स्टेशन वसंतनगर पुसद अंतर्गत गायमुख नगर हेलिपॅड जवळ गावठी कट्टा बाळगणाऱ्या हजरत बिलाल शेख मुसा (२१) रा. मधुकर नगर याला दि२५ डिसेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. गायमुख नगर ते हेलिपॅड मैदान परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या बसलेला असून त्याच्याकडे देशी बनावटीचा गावठी कट्टा (रिव्हॉल्व्हर) आहे. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे व त्यांच्या पथकाने पंचांसह घटनास्थळी धाव घेतली.हेलिपॅड मैदानाजवळ जाऊन पाहणी केली असता, एक इसम मैदानात बसलेला आढळून आला. पंचांच्या खात्रीने सदर इसमास ताब्यात घेण्यात आले.त्यास नाव-गाव विचारले असता त्याने नाव हजरत बिलाल शेख मुसा असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा देशी कट्टा (रिव्हॉल्व्हर) व एक जिवंत काडतूस मिळून आले. सदर इसमाकडे अग्निशस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलीस स्टेशन वसंतनगर पुसद येथे आरोपीवर अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणे या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक . अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. (पुसद उपविभाग) व पोलीस निरीक्षक सतीश जाधव पो.स्टे. वसंतनगर पुसद यांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात आली.कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे, पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, अशोक चव्हाण, प्रफुल्ल इंगोले, सुरेश राठोड, श्रीकांत राठोड यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद आवळकर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close