नागरिकाच्या पैशातून पगार घेणाऱ्या नप अधिकारी कर्मचाऱ्यांना साकीबशहा यांचा अल्टीमेटम; तात्काळ शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करून घाणीचे साम्राज्य स्वच्छ करा!

पुसद:पावसाळा तोंडावर असताना शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे असताना. मात्र शहरात रस्त्याची चाळण झाली असून पुसद नगर परिषदेचे कर्मचारी जाणीपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसात पावसाचे पाणी साचून नागरिकांना दुर्गंधी सामना करावे लागणार आहे.नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची झालेली चाळण, रस्त्यावर निर्माण झालेले घाणीचे साम्राज्य दुर करण्यासाठी माजी
नगरसेवक साकिब शाह यांनी रस्त्यावरील घाणीच्या पाण्यात बसून प्रशासनाला सात दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. शहरातील खड्डे बुजवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चूनही खड्डे जैसे थे कसे असा प्रतिप्रश्न करीत यामुळे प्रशासना च्या विरोधात नागरिकांतून संताप व्यक्त करीत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची वेळ नगरवासीयांना आल्याची बाब सुद्धा शाह स्पष्ट केली आहे. पुसद नगरपालिकेच्या हद्दीमधील प्रभाग क्रमांक सात मधील वसंतनगरच्या पहिल्या गल्लीमधील सांडपाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे अनेक वर्षापासून रस्ता पूर्णता खरडून गेला आहे, रस्त्याची अक्षरशा चाळणी झाली आहे. त्यामुळे रस्त्याला नालीचे स्वरूप आले आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामुळे व त्यात साचलेल्या घाणीमुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महादेवाच्या मंदिरात पूजा करण्यासाठी भाविकांना ये -जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर मस्जिद मध्ये नमाज साठी याच मार्गाने जावे लागते तसेच याच मार्गावर शाळा कॉलेज असल्याने मुला-मुलींना याच रस्त्यातील घाणेतून वाट काढावी लागते. यासोबतच या परिसरातील नागरिकांना सुद्धा घाणीच्या दुर्गंधीचा व आरोग्यास घातक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मुला मुलींसह नागरिकांचे सुद्धा या रस्त्यावरून वाट काढताना अपघात झालेले आहेत. याबाबत नागरिकांनी या नगरपालिका प्रशासनाकडे अनेकदा तोंडी व लेखी तक्रारी दिले आहेत परंतु या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी एकच संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे या महाभयंकर समस्येकडे माजी नगरसेवक तथा पुसदच्या भ्रष्टाचाराला दूर करण्यासाठी नेहमी आपल्या वेगवेगळ्या आंदोलनातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यास अग्रेसर असलेले साकिब शहा यांनी या गंभीर बाबीची दखल घेतली आणि अक्षरशा रस्त्यावरील घाणीमध्ये बसून आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. नागरिकांच्या पैशातून पगार घेणाऱ्या नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी नोकरांनी मालक बनवून हुकुमशाही गाजवून नागरिकांना त्रास देऊ नका. असा इशारा देत सात दिवसात या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन रोड दुरुस्त करून रस्त्यावरील घाण साफ न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा अल्टिमेटम साकीब शहा यांनी मुख्याधिकारी पुसद यांना आज दिलेल्या तक्रारीतून दिला आहे.