ईतर

विचाराचा प्रतिवाद,हा विचाराने व्हावा! बंजारा समाजातील विविध संघटांनी व संस्थाचालक , ठेकेदारांसह पक्षीय कार्यकर्त्यांनी स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून नेत्यांची वाहवा मिळावी यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्यांनी सकल बंजारा समाजाला गृहीत धरू नये- शेतकरी नेते मनीष जाधव!

'दाताखाली जीभ आली,म्हणून आपण दात उपटून फेकून देत नाही हे समाजाने विचार करावा!

पुसद : शहरात बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराजाच्या जयंतीचा वाद हा थांबता थांबत नाही याच जयंती निमित्तान उद्भवलेल्या वादावर दि २८ फेब्रुवारी २०२६ रोजी येथे बंजारा समाजातील विविध कर्मचारी संघटनांनी तसेच ठेकेदार शिक्षण संस्था चालक, जे कायम बंगल्याच्या राजाश्रय खाली राजकीय वर्तुळात वावरणाऱ्यांनी या वादावर स्पष्टीकरण देण्यासाठी व्यक्तीनिष्ठा जपत त्यांच्या वर समाजातील युवकांकडून जयंतीबाबत झालेल्या आरोप संदर्भात, पत्रकार परिषद आयोजित करून अभ्यास पुर्ण स्पष्टीकरण दिले होते मात्र या वादात आता शेतकरी संघटनेचे नेते मनीष जाधव यांनी उडी घेतली असून या राजआश्रित विविध संघटनाना व संबंधित ठेकेदारांना तसेच राजकीय वर्तुळात वावरणाऱ्याना थेट अल्टिमेट दिला असून त्यांनी सकल बंजारा समाजाला गृहीत धरू नये असे आवाहन शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केले आहे.पुसद शहरात बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेले संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा यात्रा काढण्याच्या कारणावरून राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई नाईक यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांच्या अपघाती निधन झाल्याने ‘सुतक’ पाळत असल्याचे कारण देत समाजातील काही युवकांना जयंती साजरी न करण्याचा सल्ला दिल्याकारणावरून बंजारा समाजातील नवीन पिढीच्या युवकांमध्ये ठिणगी पडली होती.

खरंतर हा विषय बंजारा समाजातील युवकाच्या भावनेचा कदर करणारा होता त्यावर समाजातील राज्यकर्त्यांनी गांभीर्यपूर्व विचार करायला हवा होता परंतु हे प्रकरण जाणीवपूर्वक राज्यकर्त्यांनी शिजवत ठेवल्याची चर्चा सुरू झाली आहे. संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या संदर्भाने समाजातील युवकांनी केलेल्या आरोपाबाबत स्पष्टीकरण खुलासा देण्यासाठी चक्क समाजातील राजआश्रित विविध संघटनाना व संबंधित ठेकेदार ,राजकीय वर्तुळात वावरणारे, शैक्षणिक संस्था चालकांनी स्वार्थहीत डोळ्यासमोर ठेवून नेत्यांची वाहवा मिळावी या हेतूने

चक्क पत्रकार परिषदेत आयोजन केले असताना आरोप करणाऱ्या नव्हे तर विधायक प्रश्न करणाऱ्या बंजारा समाजाच्या युवकांन बद्दल एकेरी आकस व विद्वेषाची भावना घेऊन भविष्यात समाजामध्ये अशी विद्रोही भूमिका कोणी प्रस्थापिता विरोधात घेऊ नये , म्हणून ही खबरदारी होती कां? असा आरोप या राज्यकर्त्यावर होत आहे परंतु आरोप- प्रत्यारोप करू नये म्हणून कायद्याच्या चौकटीत बसवून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येईल अशा पद्धतीची भितीदायक मांडणी किंवा स्क्रिप्ट वाचुन या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यात आले व माहीती दिली तेही आपल्याच समाजातील असलेल्या युवकांविरुद्ध परंतु ज्यां युवकांनी प्रश्न उपस्थित केले ते युवक ही समाजाचे

खरंतर या संघटनांनी या दोघां पक्षामध्ये समन्वय प्रस्थापित करून संवाद घडवून आणण्याची ही, प्राथमिक जबाबदारी होती व त्यानंतर एक वाक्यता निर्माण करणे अभिप्रेत होते पण दुर्दैवाने या आरोप करणाऱ्या युवकांकडून नेत्याची बदनामीचा कटकारस्थान केले गेले असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला ‘ ‘दाताखाली जीभ आली,म्हणून आपण दात उपटून फेकून देत नाही’त्यामुळेच या पञकार परिषदेच्या आयोजकांच्या हेतूबद्दल सकल समाजाकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत खरंतर आपली बाजू जर सत्य असती, तर आपल्याला पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देण्याची गरज नव्हती.

अशी समाज भावना आहे,आज समाजासमोर अनेक ज्वलंत प्रश्न भेडसावत आहेत मागील आठवड्यात आदर्श नगर पुसद येथील संत सेवालाल महाराजांच्या मंदिरात १४ दिवस सामाजिक कार्यकर्ते जिनकर राठोड यांनी आरक्षणासाठी अन्नत्याग आमरण उपोषण केले होते, पुसद विधानसभा मतदारसंघातून दरवर्षी जवळपास ७०, हजार बंजारा बांधव हे ऊस तोडीसाठी स्थालांतरित होतात त्यामध्ये त्यांच्या मुलांच शैक्षणिक , आरोग्य व आर्थिक नुकसान सोसावं लागतं,समाजातील वाढती व्यसनधीनता हे प्रमुख कारण पण पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजास्तव ऊस तोडी ,विट भट्टीवर कींवा वेठबिगारीच्या कामांसाठी महानगराकडे कींवा परराज्यात जावं लागतं ,यात अनेक पिढया आपल्या गारद झाल्या उसतोड तालुका म्हणून पुसदची ओळख निर्माण झाली आहे, स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध नसल्याने स्थालांतरित होतात, अनेक तांडे आज मुलभूत भौतिक सोयी सुविधा व पाण्या अभावी तहानलेले असून माळ पठारावरील उन्हाळ्यातील स्थिती अत्यंत विदारक व दाहक असते अशा अनेक ठिकाणी तांड्यावर जाण्यास मार्गक्रमण करण्यासाठी रस्ते नाहीत, मोठ्या, मोठ्या नेत्यांच्या गावात तर स्वतंत्र उत्तर कालखंडात अजुन परिवहन विभागाकडून बस सुध्दा जात नाही विद्यार्थ्यांना खाजगी बस मधून शहराच्या ठिकाणी शिक्षणाकरिता प्रवास कराव लागतं , पुसद शहरात माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक साहेबांनी तांड्यावरील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे याकरिता शासकीय ३०००हजार पटसंख्या असलेलं जवाहर वसतीगृह निर्माण केले होते पण,आज ते दुर्दैवाने बंद पडले आहे.बंजारा समाजात राजपूत , भामटा समाजाची होणारी घुसखोरी या कारणाने बंजारा समाजाच्या युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे. नैसर्गिक आपत्ती अवेळी अवकाळी पावसाने शेतकरी आर्थिक दृष्ट्या उध्वस्त झाला आहे पण नेता बांधावर कधी फिरकला नाही व स्व.वसंतराव नाईक साहेबांनी शेतकरी कारखानदार झाला पाहिजे अशी स्वप्न उराशी बाळगली होती.त्यांच्याच जिल्ह्यात बंजारा समाजाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सर्वाधिक होत आहे पुसद शहरात वसंतराव नाईक साहेबांचा १९८६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या पुतळ्याचे लोकार्पण अद्याप पर्यंत व्हायचं बाकी असल्याने तो वनवासात आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व आर्थिक अनियमित्ता झाली शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध व्हाव, याकरिता शेतकऱ्यांच्या आराध्य दैवत वसंतराव नाईक साहेबांनी सहकार क्षेत्र निर्माण करून कारखानदारी निर्माण केली होती वसंत सहकारी साखर कारखाना, सुधाकरराव नाईक साहेब सहकारी साखर कारखाना , व पुसद जैनिंग प्रेसिंग व पुसद येथील सूतगिरणी हे आपल्या कर्तृत्व शून्य नेतृत्वामुळे हा सहकार क्षेत्र सर्व नेत्यांनी ओरबडून खाल्लं त्यामुळे स्थानिकांचे रोजगार बुडाले शैक्षणिक संस्था बुडाल्या त्यांच्या फक्त स्मृर्तीच उरल्या आहेत तर मागे काळी दौलत खान येथील हत्या कांडात आपल्या नेत्यांना कार्यकर्तासह निषेध मोर्चेतून हाकलून लावले तेव्हा या सर्व ज्वलंत विषयावर कधी आपल्या विविध बंजारा समाजातील कर्मचारी संघटनांनी किंवा सामाजिक संघटना तसेच ठेकेदार व शैक्षणिक संस्था चालकांच्या वतीने पञकार परिषदेचे

आयोजन कां? केले नाही व आयोजित करण्यात आली नाही , कालच कां? की आपल्या नेत्याला हे ,दाखविण्या करीता आम्हाला आपल्या बद्दल किती ,आस्था व निष्ठा आहे, खोटी सहानुभूती मिळविण्याच्या नादात, हे सर्व स्वार्थहीत डोळ्यासमोर ठेवून नेत्यांची वाहवा मिळावी यासाठी केलेला असफल प्रयत्न होता त्यामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचा हा ,फाजील आत्मविश्वासपूर्ण प्रयत्न करत आहेत या अशा कारणास्तव खरे निष्ठावंत कार्यकर्ते नाईकां पासून दुर गेले ,हे वास्तव सत्य नेत्याच्या लक्षात येत नाहीत, त्यामुळे नेतृत्वावर आरोप -प्रत्यारोप करणारे आपलेच आहेत केवळ विषयावर गैरसमजातून मत भिन्नताअसु शकते या विषयावर चर्चा करून पुर्ण विराम देता आले असते पण या भावनिक साद घालत काही राजकीय नेत्यांना लाभ हवा होता ,नेत्याच्या सहानुभूतीसाठी या समाजातील प्रश्न विचारणाऱ्या युवकांचा बळी देऊन आपले उखळ पांढर करण्याचा डाव होता परंतु राजाश्रय मिळालेल्या विविध संघटनांनी ठेकेदारांनी व शैक्षणिक संस्थाचालकांनी तुम्ही आयोजित केलेली पत्रकार परिषदेत म्हणजे सकल बंजारा समाज नव्हे त्यामुळे समाजातील या युवकांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न हे विचारलेचं पाहिजे तेंव्हाच

समाजात नवीन नेतृत्व तयार होईल आणि समाजाला नवी दिशा मिळेल अशा समाज संघटनेच्या नावावर संपूर्ण समाजाला गृहीत धरून वक्तव्य करू नये, कारण समाजबांधव म्हणून आम्ही येतो असे मत ‘झेप न्यूज’ शी बोलताना शेतकरी संघटनेचे नेते मनीष जाधव यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close