क्राइम

मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीतील चैन चोरी करणारा आरोपी पोलीसांच्या ताब्यात;वसंतनगर पोलीसांची उल्लेखनीय कामगीरी! 

एकूण ६,५१,५००/- रू. चा मद्देमाल हस्तगत!

पुसद: वसंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी फिर्यादी नामे अभिजित प्रकाश पानपट्टे वय ३२ वर्ष रा. हनुमान वार्ड पुसद जि. यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन वसंतनगर येथे येवुन रिपोर्ट दिला की, पुसद येथे मनोज जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज, यांचे दर्शन घेत असतांना जमलेला गर्दीचा फायदा घेवुन कोणीतरी अज्ञात इसमांने फिर्यादी यांच्या गळयातील सोन्याची चैन ४ तोळे कि.अ. २,५०,०००/- रु. चोरून नेली अशा फिर्याद वरून पो.स्टे. वसंतनगर येथे अप क. ५६९/२०२३ कलम ३७९ भा.द.वी प्रमाणे गुन्हा नोंद असुन सदरच तपास हा मा.पो.नी.सा प्रवीण नाचनकर पो.स्टे. वसंतनगर यांनी पोउपनी योगेश जाधव व डि.बी पथक कर्मचारी यांना अज्ञात आरोपीत इसम शोध घेणे करीता नियुक्त करण्यात आले. तपासा दरम्यान रॅलीतील मोबाईलमध्ये काढलेले फुटेज व फोटो चेक करीत असतांना व्हिडीओमध्ये संशयीत इसम हा फिर्यादी याची चैन तोडतांना आढळुन आला. सदर इसमाचे फोटो घेवुन बाहेर जिल्हयात गोपनीय माहितगाराला सदर चैनचे तोडतांना संशयीत इसमाचा फोटो पाठवुन विचारपुस केली असता. एका गोपनीय माहितदारांनी कळविले की, हा फोटो सचिन बाळु पवार, वय २७ वर्ष, जात-आहीवली हा नाथनगर पाथर्डी, जि. अहमदनगर येथे राहत असुन त्याची अंतर्भुत माहिती जमा करून मा. पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड साहेब यांच्या आदेशाने मा. उप.वि.पो.अ. पंकज अतुलकर साहेब व पो.नी. नाचनकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी योगेश जाधाव सोबत डि.बी. पथक पोहेका अशोक चव्हाण, पाहेका मुन्ना आडे, नापोका संजय पवार, असे जिल्हा अहमदनगर येथे संशीतय इसम यांच्या शोध घेणे कामी दि.७ डिसेंबर २०२३ रोजी रवाना करण्यात आले. संशयीत इसमाचा ग्राम पाथर्डी व इतर ठिकाणी असे सतत ०४ दिवस शोध घेतला असता त्यांची अंतर्भत माहिती काढुन तो कलाकेंद्र येथे जाण्याच्या सवयीचा असल्याची माहिती गोपनीय माहितगाराकडुन मिळाली त्याचे फोटो सदर कलाकेंद्र जामखेड येथील कलाकेंद्र वाल्याला दाखविले असता त्यांनी ते फोटो ओळखले व तो जबदंबा कलाकेंद्रामध्ये येत असता असे सांगीतले. आम्ही जगदंबा कलाकेंद्र मध्ये सापळा लावुन बसलो असता तो दि.०९/१२/२०२३ ला रात्री ०९/०० सुमारस त्याच्या मित्रा सोबत स्विफ्ट गाडी घेवुन जगदंबा कला केंद्र येथे आला तो गाडीतुन उतरचाच आम्ही त्याच ठिकाणी सापळा रचुन पकडले व त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन बाळु पवार, वय २७ वर्ष, रा. पाथर्डी जि. अहमदनगर असे सांगीतले. त्यास पुसद येथील चोरीस गेलेली चैन बाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, ती चैन पुसद येथील छत्रपती चौक येथील मनोज जरांगे पाटील यांच्या रॅली मधुन त्याने चोरीली आहे. सदर संशयीत इसम याला ताब्यात घेवुन चैन बाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, ती चैन ही त्याच्या जवळ असलेल्या स्विफ्ट गाडीमध्ये आहे. आरोपी इसम याच्या कडुन चैन कि.अं. २,५०,०००/-रू. व गुन्हयात वापरण्यात आलेली स्वीफ्ट गाडी क. एम.एच. १४ डि.टी. ५८१० कि.अं. ४,००,०००/-रू. तसेच वापरण्यात आलेला मोबाईल कि.अं. १,५००/-रु. काढुन दिल्याने असा एकुण मद्देमाल ६,५१,५००/-रु. ताव्यात घेण्यात आली. चा सदर अरोपीस याला गुन्हात अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोउपनी योगेश जाधव करीत आहे.सदरची कार्यवाही मा. डॉ. पवन बंसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पंकज अतुलकर, उप.वि.पो.अ. पुसद यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रवीण नाचनकर, ठाणेदार पोलीस स्टेशन वसंतनगर पो.उप.नि. योगेश जाधव, पोहेका अशोक चव्हाण, पाहेका मुन्ना आडे, नापोका संजय पवार, नापोका, नितीन आडे हे करीत आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलिसांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close