तालुक्यात पुन्हा ढगफुटी सदृश्य धो धो बरसला : अनेकांच्या शेतात पुन्हा पाणी!

महागाव/प्रतिनिधी (संदीप खरे कदम) महागाव तालुक्यात २१ व २२ जुलै २०२३ च्या रात्री दरम्यान झालेल्या ढग सदृश्य पाण्यामुळे महागाव तालुक्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असण्याची घटना ताजी असतानाच आज गुरुवार दि.२७ जुलैला सकाळपासूनच पुन्हा खूप मोठ्या प्रमाणात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला सर्वत्र पावसाचा अंदाज व्यक्त होत असल्याने यवतमाळ जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने आज सर्वत्र शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती महागाव तालुक्यातील वाकान कोनदरी, तीवरंग, या गावात नाल्याचे पाणी घुसले तर राऊतवाडी येथील नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक नागरिक गावाबाहेर पडू शकले नाही अनेक गावांचा संपर्क तुटलेला होता धुवाधार पावसामुळे जिल्ह्यात गंभीर
स्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून व तालुका प्रशासनाकडून घेण्यात येत असून सध्या सुरु असलेल्या धुवाधार पावसामुळे गेल्या तीन दिवसांपासून त्यांना बाहेर निघणे कठीण झाले होते दरम्यान कर्तव्यदक्ष एसडीओ एकनाथ काळबांडे साहेब यांनी वाकान कोणदरी येथे भेट दिली तर धनोडा येथील जुन्या बस स्थानकावरील भुसार व्यापारी संजय अराडे यांच्या मालाच्या नुकसानीची पाहणी केली.



