ईतर

पुसद येथील विद्युत विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी रोहित्र दुरुस्तीच्या नावाखाली केलेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी करून निलंबित करा!

पुसद: येथील म.रा.वी.वी.कंपनी कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांनी सन २०१८ते ऑगस्ट २०२० या आर्थिक वर्षाच्या कार्यकाळात रोहित्र (ट्रांसफार्मर)दुरुस्तीच्या नावाखाली संबंधित एजन्सी व संस्थाचालका सोबत संगणमत करून शंभर ते दीडशे कोटी रुपयांचा अपहार केल्यामुळे कार्यकारी अभियंता व कंत्राटदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कार्यकारी अभियंता तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुसद (आठवले) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने करण्यात आली असून ही तक्रार राज्याचे ऊर्जामंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की,पुसद येथील म.रा.वी. वी. कंपनी कार्यालयाचे कार्यकारी अभियंता संजय श्रावण आडे यांनी सन २०१८ ते ऑगस्ट २०२० या आर्थिक वर्षाच्या कार्यकाळात रोहित्र (ट्रांसफार्मर)दुरुस्तीच्या नावाखाली दारव्हा उपविभाग, दिग्रस उपविभाग, पुसद उपविभाग, महागांव उपविभाग, उमरखेड उपविभाग व ढाणकी उपविभागात वीज वितरण पुसद कार्यालयाच्या वतीने दि.१८ जून २०१८ ते ऑक्टोंबर २०२० या कालावधीत संबंधित एजन्सी व संस्थाचालक त्यामध्ये मोरया इलेक्ट्रीकल्स, एम. के. इलेक्ट्रीकल्स, महालक्ष्मी इलेक्ट्रीकल्स, वरद इलेक्ट्रीकल्स, सत्यशांती इलेक्ट्रीकल्स, विश्वशांती इलेक्ट्रीकल्स, सुमन इलेक्ट्रीकल्स, गजानन इलेक्ट्रीकल्स, मंगलमुर्ती इलेक्ट्रीकल्स, कस्तुरी इलेक्ट्रीकल्स, श्रध्दा इलेक्ट्रीकल्स, साई इलेक्ट्रीकल्स, धानोरकर इलेक्ट्रीकल्स, अली इलेक्ट्रीकल्स, श्री तायवाडे इलेक्ट्रीकल्स, सत्यसाई इलेक्ट्रीकल्स, पत्रे इलेक्ट्रीकल्स, एन.लाईट इलेक्ट्रीकल्स, मातोश्री इलेक्ट्रीकल्स, सर्व रहिवासी पुसद व इतर बाहेरगावी असलेले यामध्ये औरंगाबाद, नागपूर आंध्रप्रदेश या ठिकाणच्या संस्थांशी संगणमत करून कार्यकारी अभियंता यांनी शंभर ते दोनशे कोटी रुपयाचा अपहर केला आहे यामध्ये हजारो मेट्रिक टन ओईल ची खरेदी प्राप्ती करून घेऊन एका रोहित्र (ट्रान्सफार्म ) दुरुस्तीवर२५००/रुपये खर्च झाल्याचे दाखवून लाखो रुपयाची दरमहा बिले काढली आहे.तर शेतकऱ्याकडून सुद्धा रोहित्र (ट्रांसफार्मर) दुरुस्तीच्या नावावर नियमबाही पद्धतीने ६० ते ७० हजार रुपये उकळले आहे. थातूरमातूर रोहित्र (ट्रांसफार्मर) दुरुस्त करून पुन्हा पुन्हा बिले काढली जात आहे.तर आदिवासी विकास विभागामार्फत आलेल्या रोहित्र (ट्रांसफार्म) निधीतून रोहित्र (ट्रांसफार्म) आदिवासी पाड्यात न लावता इतर लावण्यात आले आहे. शासनाच्या विविध निधीत कोट्यावधीचा भ्रष्टाचार त्यांचा सोबत संगणमत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला कोट्यावधी रुपयाचा चुना लावला आहे. त्यामुळे या प्रकरणाची पंधरा दिवसाच्या आत सखोल चौकशी करून कार्यकारी अभियंता यांनी संबंधित कंत्राटदारासोबत संगममत करून अपहार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करून कंत्राकदारांना काळ्या यादी टाकून कार्यकारी अभियंता यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुसद (आठवले) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने करण्यात आली संबंधित विभागाकडे व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे जर या तक्रारीवर पंधरा दिवसाच्या आत कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छडण्याचा इशारा दिला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close