ईतर

पुसद येथील श्री बालाजी कथा महोत्सवाचे यशस्वी आयोजन..

 

पुसद: येथील राजस्थान मंडळ व माहेश्वरी संघटना तसेच माहेश्वरी महिला संघटनेच्या वतीने अधिकामासाच्या शुभ मुहूर्तावर पुसद नगरी येथे प्रथमच १८ जुलै ते २२ जुलै या कालावधीत श्री युगल शरणजी महाराज यांच्या मधूर मधुर वाणीने श्री बालाजी कथेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे मुख्य यजमान म्हणून श्री बालाजी इंदाणी यांना लाभले. अग्रवाल मंगल कार्यालय, पुसद येथे कथेचे आयोजन आनंदात व उत्साहात करण्यात आले. कथेच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमात भगवान विष्णू आणि भृगु ऋषींची तबकडी दाखवण्यात आली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री बालाजी कल्याण महोत्सवाची तबकडी, तिसर्‍या दिवशी दीप महोत्सव यावेळी कथे दरम्यान श्री बालाजी कथेची आकर्षक व भव्य झांकी दाखवण्यात आली, कथेच्या चौथ्या दिवशी श्री रंगनाथ स्वामी व गोदाम्मा देवी यांची झांकी सादर करण्यात आली, कथेच्या पाचव्या व शेवटच्या दिवशी भगवान राधाकृष्णाची तबकडी सादर करण्यात आली.

आरतीनंतर महाप्रसादाने कथेची सांगता झाली. सर्व भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन या कथेचा आस्वाद घेतला.कथा यशस्वी करण्यासाठी श्री.विजय भांगडे,श्री.सतीश भंडारी,श्री.आनंद हेडा,श्री.संजय मालपाणी,श्री.दिलीप इंदाणी,श्री.विनोद मालू ,श्री.सौरभ सोनी, श्री.श्याम सारडा, श्री.संतोष बजाज, श्री.उमेश सारडा, श्री.राधेश्यामभाऊ शर्मा, श्री.हरीश हेडा, बंटी काबरा, श्री.मदनजी मुंदडा, श्री.किशोर जाजू, श्री.राजू जाजू, श्री.गोपाल सोमाणी, श्री.चंद्रकांत गजबी, श्री.कैलाश अग्रवाल, श्री.गोपाल सोमाणी, श्री.सुशील भंडारी, ओंकार तोष्णीवाल, अनिता सारडा, अपर्णा सोनी, माधुरी मुंदडा , किशोर तोष्णीवाल,सुशील इन्नाणी,कन्हैया भंडारी,उर्मीला सोनी,सौ.वनीता पनपालीया,सौ.सुषमा अग्रवाल,आशा बजाज,डॉ.राजेन्द्र जाजु, प्रचार समितीचे श्री  आखिलेश अग्रवाल ,श्री शरद बजाज,श्री रुपेन्द्र अग्रवाल ,श्री नवल बजाज व राजस्थान मंडळ पुसद , तालुका माहेश्वरी संघटना व पुसद तालुका माहेश्वरी महिला संघटनेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close