ईतर

विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कोळसा मधील विद्यार्थ्यांचे कबड्डी स्पर्धेत यश…

हिंगोली/प्रतिनिधी(शिवाजी कऱ्हाळे ): विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा मधील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा चे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेबांनी सर्व विजय प्राप्त केलेल्या खेळाडूंचा सत्कार केला व अभिनंदन केले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा आनंदीताई बेंगाळ, सचिव अंकुशराव बेंगाळ, प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ, कवी शिवाजीराव कह्राळे, क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक प्रकाशराव शिंदे पाटील, मुख्याध्यापक शिंदे आर.बी.,मुख्याध्यापक श्री सरकटे व्ही.एस. पर्यवेक्षक कसाब पी.पी., तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी खेळाडूंमध्ये नारायण नायकवाल, पवन नायकवाल, कार्तिक नायकवल,कार्तिक लक्ष्मण नायकवाल, गोपाल घोंगडे,अजय घोंगडे, पंढरी लांडगे, या खेळाडूनी कबड्डीमध्ये प्रथम पारितोषिक खेचून आणले व या सर्व खेळाडूंची जिल्हा कबड्डी स्पर्धेमध्ये निवड झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close