ईतर

बैलबंडीतून निघाली नवागतांची मिरवणूक…! शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सवानिमित्त डफडीच्या तालावर व लेझिम पथकाव्दारे विद्यार्थ्यांचे स्वागत

पुसद: विदर्भातील शाळांचा टोल शुक्रवारी(ता.३०) मोठ्या उत्साहात पडून नवागतांचे स्वागत विविध पद्धतीने करुन सर्व शाळा किलबिलल्या आहेत.पुसद तालुक्यातील वडसद तांडा येथील जि.प.प्रा.शाळेतील चिमुकल्यांची मिरवणूक बैलबंडीतून काढून शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

जि.प.शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत जामगडे सहाय्यक शिक्षक साहेबराव राठोड यांनी शाळा प्रवेशोत्सवानिमित्त गावकर्‍यांच्या सहकार्याने बैलजोडीवर झुली टाकून इयत्ता पहिली मधील नवागत विद्यार्थ्यांच्या हातात फुगे देत त्यांची बैलबंडीतून डफडीच्या तालावर व लेझिमच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढली.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर जाधव,गावच्या सरपंच सुषमा राठोड,ग्रामपंचायत सदस्य बळीराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव राठोड,अश्विन राठोड,राजेश राठोड,शंकर राठोड,नरेश राठोड,मांगीलाल राठोड,प्रदीप राठोड,रवींद्र राठोड आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी प्रभातफेरीत सहभागी होऊन चिमुकल्यांची गावभर मिरवणूक काढली.यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी शिक्षण विषयक घोषणा देऊन गावकर्‍यांचे लक्ष वेधले.मिरवणूकीचा समारोप शाळेच्या आवारात करण्यात आला.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दाखलपात्र विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश नोंदवून सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.दरम्यान गट संसाधन केंद्राच्या विषय साधन व्यक्ती अनिता पावडे यांना शाळा शुभारंभानिमित्त शाळेला भेट देऊन शिक्षक व गावकर्‍यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.यशस्वितेसाठी कमल चव्हाण व विद्यार्थी मंडळ यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close