ईतर

मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीमारप्रकरणाचा पुसद बार असोसिएशनच्या वतीने तीव्र निषेध!

पुसद :जालना जिल्ह्यात पोलिसांनी मराठा आरक्षण आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद राज्याच्या अनेक जिल्ह्यांत उमटत आहे. राज्य सरकारच्या विरोधात रास्ता रोको, निषेध मोर्चे, बंद अशी आंदोलने करण्यात येत आहे.त्याच घटनेच्या निषेधार्थ पुसद बार असोसिएशनच्या वतीने आज १२:३०वाजणच्या सुमारास तीव्र निषेध नोंदविला आहे.

सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेल पुसदच्या वतीने सुध्दा निषेध नोंदविण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे पोलिसांनी शुक्रवारी मराठा आरक्षण आंदोलकांवर लाठीमार केला होता.मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न शांततेत सोडविण्याऐवजी दडपशाही, हुकूमशाही करण्यात येत आहे.मराठा समाजाचं उपोषण आंदोलन चिरडण्याच्या मागे आहे.त्यामुळे उपोषणकर्त्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज करणा-या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर त्वरीत कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी उपविभागीय अधिकारी मार्फत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.बार असोसिएशन पुसदचा ठराव घेण्यात आला. त्यास सूचक ॲड.विवेक पांडे वअनुमोदन ॲड.पवनकुमार जैन यांच्या सह्या आहेत.

 

येथील पुसद वकील संघाचे अध्यक्ष ॲड.शिवाजी खराटे व सचिव ॲड.गोपाल मस्के यांच्या नेतृत्वामधील महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलचे जिल्हा सरचिटणीस ॲड.अभिषेक रूडे यांच्या नेतृत्वामध्ये देण्यात आले आहे.उपविभागीय अधिकारी कार्यालयात दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी दिलेल्या निवेदनावर पुसद वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवाजी खराटे, सचिव ॲड. गोपाल मस्के, कोषाध्यक्ष ॲड.अभिमान खैरमोडे, ॲड.प्रशांत देशमुख, ॲड. अभिषेक रुडे, ॲड.तलाह मिर्झा, ॲड.माधवराव माने, ॲड.आदित्य माने, ॲड.नय्यर खान, ॲड.कैलास राठोड, ॲड.संजय राठोड, ॲड.प्रशांत ठाकरे, ॲड.राजेंद्र शिंदे,

ॲड.बालाजी कपटे, ॲड.भारत जाधव, ॲड.पवनकुमार जैन, ॲड.संदीप कोठुळे, ॲड.राजेंद्र गावंडे, ॲड.मनोज घाटगे (पाटील), ॲड.रमेश पाटील, ॲड.सुरज भुसाळे, ॲड.अभिजित राठोड, ॲड.राज कांबळे, ॲड.अभिषेक राठोड, ॲड.के.एम.राठोड, ॲड.अर्चना मोरे, ॲड.अनिता देशमुख, ॲड.छाया देशमुख, ॲड.सूचिता नरवाडे, ॲड.सुशिला नरवाडे, ॲड.जहीर खान, ॲड.विनोद पाटील, ॲड.आरिफ अहेमद, ॲड.कैलास राठोड, ॲड.दिनेश राठोड, ॲड.केशव राठोड, ॲड.अवधूत राजे, ॲड.श्रीपाद राजे, ॲड.श्वेता पांढरीपांडे यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदविला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close