काळी दौ येथे सौ मोहिनीताई इंद्रनिल नाईक यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

काळी दौ/प्रतिनिधी: काळी दौ परिसरातील एकमेव जागृत विठ्ठल मंदिर असून आषाढी एकादशीनिमित्त पुसद विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार इंद्रनील नाईक साहेब यांच्या अर्धांगिनी सौ मोहिनीताई नाईक यांनी , वारकरी शेतकर्यांचे दैवत विठ्ठल रुक्माई मंदिरात जाऊन दर्शन घेतले यावेळी , विठ्ठल मंदिराचे देखरेख करणारे सुनील जाधव यांनी सपत्नीक सौ मोहिनीताई नाईक यांचा सत्कार केला.
यावेळी ह भ प डवरे महाराज, नामदेव राठोड,हंसराज मोरे प्रा नरेंद्र जाधव नथू आढाव तुकाराम राठोड सुभाष जाधव,बलदेव जाधव हेमराज राठोड बाबूसिंग राठोड,विश्वपाल ढोबळे,वसंत जाधव,राहुल खंडागळे, सुजित चव्हाण, हिरासिंग जाधव ,तुकाराम चव्हाण,सुधाकर राठोड,मनोहर चव्हाण, विलास राठोड,अभय मोरे विनोद महाराज,आदी राष्ट्रवादी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सुनिल जाधव यांनी फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता ,परिसरातील भक्तमंडळीमोठ्या उत्साहाने दर्शनाला येत असतात बाळु सोळंके ,प्रभु वाघमारे,संभाजी शेळके,संतोष साखरकर वैभव मांडवगडे,निर्माण जाधव ,विश्वनाथ जाधव,रोशन राठोडआदीनी परिश्रम घेतले



