पुसद येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली;गुरुदेव सेवा मंडळाच्या पुढाकाराने ५६ वा स्मृतिदिन!

पुसद : स्थानिक गुरुदेव सेवा मंडळ, तालुका शाखेच्या पुढाकाराने मानवतेचे महान पुजारी, ग्रामगीता निर्माते वंदनीय राष्ट्रसंत महाराजांच्या 56 व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुदेव अनुयायांकडून मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश लामणे होते.यावेळी कार्याध्यक्ष प्रा. नंदकुमार खैरे, उपाध्यक्ष मनोहर बनस्कर, ग्रामगीताचार्य राजेंद्र काळबांडे उपस्थित होते.
सर्वप्रथम राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आली. याप्रसंगी ग्रामगीताचार्य राजेंद्र काळबांडे यांनी राष्ट्रसंतांच्या लोककल्याणकारी व समाजोपयोगी कार्याचा आढावा घेतला. ध्यक्षीय समारोप करताना प्रा. प्रकाश लामणे यांनी राष्ट्रसंतांची ग्रामगीता ही आधुनिक काळातील संजीवनी बुटी असल्याचे सांगितले. याप्रसंगी मंडळाचे प्रचारक किसनराव गरडे यांनी गुरुकुंज आश्रमाकडून ग्रामगीताचार्य पदवी संपादन केल्याबद्दल यांना ग्रामगीता ग्रंथ देवून मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. तर महिला प्रतिनिधी इंदू राऊत यांनाही ग्रामगीता देवून अभिष्टचिंतन करण्यात आले. वेळी गुरुदेव अनुयायांनी राष्ट्रसंतांची खंजेरी भजने साग्रसंगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी खंजेरीवादक सुरेश कदम, रमेश सरागे, अनिल अस्वार, ज्ञानेश्वर सुरडकर, प्रमोद जयस्वाल, विठ्ठलराव येवले, यशवंत भगत, पंजाब गडदे, पांडुरंग शिनगारे, कैलास साखरे, वसंतराव ढोणे, महिला प्रतिनिधी छाया प्रकाश लामणे, इंदूताई राऊत-पवार आदीची उपस्थिती होती.यावेळी पुसद शहर व परिसरातील गुरुदेव अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



