श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन महोत्सव उत्साहात साजरा!

पुसद- स्थानिक श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भव्य शिक्षण संकुलात भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन महोत्सव १५- ऑगस्ट २०२५ रोजी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्य इमारतीवर प्राचार्य रामचंद्र हिरवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून भारतीय सेनेच्या मराठा लाईट इन कॅन्टरी मध्ये सेवा देणारे सेवानिवृत्त सैनिक प्रमोद मोतीराम भोसले , तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.लक्ष्मण वानखेडे, उपप्राचार्य दत्तात्रेय जीवने ,प्रा. गणेशराव रावते पालक प्रतिनिधी प्रमोद माटे, पर्यवेक्षक प्रज्ञा गडदे, व्ही .ए. राऊत, मोहन राठोड, एन.सी.सी ऑफिसर विजय डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज व देवराव पाटील चोंढीकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य रामचंद्र हिरवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात एन.सी.सी कॅडेट आणि राष्ट्रीय सेवा योजना च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला व मान्यवरांना मानवंदना दिली. मान्यवरांच्या स्वागतानंतर विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर भाषण, समूह गीत गायन आणि देशभक्तीपर नृत्य सादर करण्यात आले. देशभक्तीपर नृत्यामध्ये ऑपरेशन सिंदूर आणि इस मिट्टी के सौगंध ही थीम कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली . त्यानंतर देशभक्तीपर गीतांवर प्रा नीता खराटे यांच्या मार्गदर्शनात संगीतमय विद्यार्थी कवायत सादर करण्यात आली. सारंग कोरटकर , महेंद्र अंबुरे व संच यांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रामचंद्र हिरवे यांनी अध्यक्षीय मनोगतातून देश सेवा करण्यासाठी विविध माध्यमातून देशाचे युवक समोर आले पाहिजे विद्यार्थी युवकांनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे व शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचे सदैव स्मरण ठेवावे असे मत व्यक्त केले .सदर कार्यक्रमाचे विविध टप्प्यातील सूत्रसंचालन वृषाली खैरे, शिल्पा कदम ,अर्चना भगत यांनी केले तर राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. गजानन जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. खाऊ वाटप करून वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. गजानन जाधव, प्रा निलेश जाधव, मंगेश जाधव, अविनाश देशमुख ,सचिन नालींदे, गजाभाऊ भगत ,सचिन आखाडकर, चैतन्य ठाकरे ,सारिका जाधव, प्रा. योगिता काष्टे, प्रा. मोनिका मंदाडे, विद्यार्थी प्रतिनिधी स्कूल कॅप्टन जयश्री चव्हाण यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी श्री शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच अध्यापक विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व गणमान्य पालक उपस्थित होते.
