शिव सामान्यज्ञान परीक्षेला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद;रविवारी गजबजल्या शाळा:मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन!

पुसद:हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती निमित्त आयोजित शिवसामान्यज्ञान परिक्षेमुळे तालुक्यातील शाळा रविवारी सुद्धा गजबजल्या आहे. परिक्षेकरीता तब्बल २०००० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी शहरी गटातील ७४३६ तर ग्रामीण तथा शहराबाहेरील गटातील सुमारे ८००० एकुन १५४३६ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. येथील छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती च्या वतीने आयोजित आणि भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने प्रायोजित परीक्षेकरिता विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे.येथील कोषटवार दौलतखान विद्यालय व गो. मु. कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षेचा प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दिगंबरराव जगताप होते. छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे मार्गदर्शक शरद मैंद, गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे, मुख्याध्यापक गजानन वायकुळे, पर्यवेक्षक अनंत जाधव, बलराम मुराडी यांची प्रमूख उपस्थिती होती.सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे हस्ते शिवपूजन घेण्यात आले.उद्धाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबरराव जगताप यांनी हिंदवी स्वराज्य स्थापना विश्वातील अतुलनीय पराक्रम असल्याचे सांगून छत्रपतींच्या विचारांचा जागर काळाची गरज असल्याचे सांगितले .
तत्पूर्वी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यासाठी परीक्षेचे आयोजन आवश्यक असल्याचे सांगितले. परीक्षेत सहभागी शाळा प्रमुखांचे त्यांनी आभार व्यक्त केले.मान्यवरांनी परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शोभायात्रा समितीचे प्रमुख अजय क्षीरसागर, मोटार सायकल रॅली प्रमुख वैभव फूके, भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष ॲड भारत जाधव, नितीन पवार, धर्मेंद्र जळगांवकर, दीपक जाधव यांची प्रमूख उपस्थिती होती. गेल्या एक महिन्यापासून समिती सदस्य परिश्रम घेत होते. समिती प्रमुख चंद्रकांत ठेंगे, समिती सदस्य अमोल शिंदे, नागेश जोगदे, किरण वा. देशमुख, उमेश इंगळे, शशिकांत जामगडे, गजानन इंगोले, किरण बाळासाहेब देशमुख, रवींद्र घड्याळे, अमोल व्हडगिरे, चंद्रशेखर देशमुख, मनीष जयस्वाल यांनी अचूक नियोजन केले. निलेश सिंहस्थे, विजय पाटील, रुपेश देशमुख, अभिजित बोरकर, गजानन जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.पुसद अर्बन बँक आणि भारती मैंद पतसंस्थेचे कर्मचारी, यांचे सह सहभागी सर्व शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाप्रमुख,पालकांचे सहकार्य लाभले.
छञपती शिवरायांना वैचारिक अभिवादन करणारी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक ठरत आहे. अनेक जिल्ह्यातून परीक्षा आयोजनसंबंधी विचारणा होत आहे.छत्रपती शिवरायांचे प्रेरक विचार विद्यार्थ्याना भविष्यात समृध्द करतील याकरिता सेवाभावी कार्य करतांना सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्था प्रमुखांचे सहकार्य मिळाले.
चंद्रकांत ठेंगे, समिती प्रमुख, शिवसामान्यज्ञान परीक्षा समिती पुसद