ईतर
शिवसेना (उबाठा) गटाची मुलुख मैदान तोफ खासदार संजय राऊत यांच्या हस्ते राजु वाकडे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार!

पुसद : दैनिक सामनाचे संपादक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मुलुख मैदान तोफ आणि पक्षप्रमुखांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व खासदार संजय राऊत यांच्या हस्ते नुकतेच एकनिष्ठ शिवसैनिक तथा सामना दैनिकांचे विभागीय प्रतिनिधी, राजु वाकडे यांनी विभागात निष्ठापूर्वक वार्तांकन सोबतच वार्षिक देणगीदार मोहीमेत मोठे परीश्रम घेऊन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा प्रबोधन प्रकाशन पतसंस्था मुंबई तर्फे संभाजी नगर येथे आयोजित कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अल्पवधित त्यांनी पत्रकारीक्षेत्रात मोठी झेप घेतल्याने त्यांचे विभागात कौतुक होत आहे.या प्रबोधन प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी संपादक तुलसी साहेब, राजेश देशमाने,सर, मंडले सर अनेक मान्यवर पत्रकार प्रतिनिधी, वार्ताहर उपस्थित होते.