ईतर

पुसद परिसरात दर्जेदार केळीचे ‘क्लस्टर’ विकसित करा- एसडीओ आशिष बिजवल : पार्डी येथे प्रयोगशील शेतकऱ्यांशी संवाद 

पुसद:अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागायतदारांच्या वरुड भागाची कॅलिफोर्निया अशी ओळख आहे. फळबागांमुळे तेथील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. आता पारंपरिक शेतीपेक्षा शेतकऱ्यांनी फळबागेकडे वळावे. पुसद परिसरात जमीन व पाण्याची उपलब्धता असल्याने केळी पिकाची लागवड करावी. केळीचे ‘क्लस्टर’ तयार करून आर्थिक सुबत्ता मिळवावी, असे आवाहन उपविभागीय महसूल अधिकारी आशिष बिजवल यांनी केले.

पुसद नजीकच्या पार्डी येथे चैत्रवेल फार्म मध्ये मंगळवार ता.२५ रोजी आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात अध्यक्षपदावरून एसडीओ बिजवल बोलत होते. यावेळी मंचावर तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे, वसंत बायोटेकचे संचालक व केळी तज्ज्ञ प्रा. गोविंद फुके उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते केळी घडाचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रयोगशील शेतकरी दिनकर गुल्हाने व शिवराम शेटे यांनी पाहुण्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.एसडीओ आशिष बिजवल यांनी पार्डी व परिसरातील केळी उत्पादक तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांची संवाद साधला. केळी पीक लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी तज्ज्ञांकडून प्रशिक्षण घ्यावे. यासाठी केळी तज्ज्ञ शेतकरी तसेच कृषी विभागाची मदत घ्यावी. काटकसरीची अभ्यासपूर्ण शेती फायदेशीर ठरू शकेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शेतीमाल वाहतुकीस अडसर ठेवणारे पांदण रस्ते विषयक अडचणी त्यांनी शेतकऱ्यांकडून जाणून घेतल्या. परिसरातील पांदण रस्त्यासाठी आपण गाव पातळीवर तलाठी यांना सूचना दिल्या आहेत. या बैठकीला आवश्यकता असल्यास आपण स्वतः येऊ, असे सांगून त्यांनी पांदण रस्त्यासाठी संबंधित सर्व शेतकऱ्यांनी एकत्रितपणे यावे, असे आवाहन केले.

दुग्धोत्पादनाची मोठी संधी… 

तालुक्यात दूध खरेदीसाठी चार ते पाच मोठ्या कंपनी उपलब्ध आहेत. त्याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी दुग्धोत्पादन वाढवावे. पुसद येथील अमृतधारा कंपनीला दरवर्षी चार ते सहा कोटी चे दूध बाहेरून बोलवावे लागते. हा पैसा दुग्धोत्पादनाद्वारे आपल्याकडेच ठेवता येईल. शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे स्वतःच्या शेतात चारा लागवड करून चारा टंचाईवर मात करावी. केळीच्या पानांचाही चाऱ्यासाठी उपयोग होऊ शकतो, असे आशिष बिजवल यांनी सांगितले. दिवसेंदिवस भूगर्भातील पाणी पातळी प्रचंड उपशामुळे खोल जात आहे. यावर उपाय म्हणजे जलसंधारण होय. शेतकऱ्यांनी विहीर पुनर्भरण यासारखे प्रयोग करून पाणीटंचाईवर मार्ग शोधावा, असे बिजवल म्हणाले.

 

 

स्वतःचे, जमिनीचे आरोग्य राखा : विजय मुकाडे 

शेतकऱ्यांनी जमिनीतून एकसारखी पिके घेताना अन्न मूलद्रव्य घटतात. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. स्वतः सोबतच जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी शिका, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांनी दिला.

जमिनीतील कर्ब वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करा, त्यासाठी जोड धंदा म्हणून गुराढोरांचे पालन करा, फळबाग क्षेत्रात वाढ करा, असे त्यांनी सांगितले.

केळीत दम, अधिक दाम मिळवा : प्रा. गोविंद फुके 

केळी पीक हे अतिशय सोपे आहे. कमी पाण्यात ठिबक सिंचनवर दर्जेदार पीक काढता येते. गुणवत्ता पूर्ण केळीची रोपे वापरा, शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी आपण केव्हाही उपलब्ध आहोत. केळी पिकात दम आहे. त्यामुळे केळीचे लागवड करून अधिक दाम मिळवा, असे आवाहन केळी तज्ज्ञ प्रा. गोविंद फुके यांनी व्यक्त केले.

सुरुवातीला केळी तज्ज्ञ व मान्यवरांनी चैत्रवेल फार्म मधील केळी पिकाचे निरीक्षण केले. दर्जेदार केळी घड पाहून केळी पिकाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी केळी तज्ज्ञ, तसेच केळी उत्पादक शेतकरी यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या केळी पिकातील प्रयोगाबद्दल दिनकर गुल्हाने, त्यांचे सहकारी शिवराम शेटे यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. दिनकर गुल्हाने यांनी केले. डॉ. माधवी गुल्हाने यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला सरपंच विठ्ठल जाधव, प्रकाश पाटील, परसराम गोरे, रामभाऊ गोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेमनीष जाधव, अभय गडम, अजय गरड, शंकर चव्हाण, समाधान केवटे, गजानन जाधव, गजानन गोरे, आनंदराव गोरे, प्रकाश गोरे, बाळासाहेब पाटील, निलेश चिकणे, विकी झरकर , देविदास झरकर, पोलीस पाटील रामराव काळे, सतीश गोरे, लक्ष्मण जाधव, दादाराव ढेकळे, मधुकर हरीमकर, प्रदीप हरीमकर, ज्ञानेश्वर वाठ, दीपक मोटे, अरुण नागुलकर, सलीम खान, हितेश पांडे, अमोल झरकर, प्रवीण भंडारी, प्रविण भंडारी,कृषी सहाय्यक अनिल करे, कृषी पर्यवेक्षक नितीन नरवाडे, सुरेश सूर्य, जितेंद्र दीक्षित व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close