ईतर

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या! सकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन!

पुसद:बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या घटनेविरोधात सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पुसद परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज मंगळवार दि.११ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देवून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, यासह धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांचा अपमान करणाऱ्या नागपूर येथील प्रशांत कोरटकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्या विरोधात कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्व.संतोष देशमुख यांना अत्यंत निघृणपणे ठार करण्यात आल्याचे सातत्याने सांगितले गेले. पण सरकार मात्र चौकशी सुरु आहे. एवढेच पालुपद लावत होते. संतोष देशमुख या हत्याप्रकरणात नुकतचं सीआयडीकडून आरोप पत्र दाखल करण्यात आलं आहे, या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी व फोटो बाहेर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला व हळहळला. माणुकीसाला काळीमा फासणारा हा प्रकार पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. याप्रकरणी सरकारला शेवटी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला असला तरी धनंजय मुंडे यांची सखोल चौकशी करून स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, यासह धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावी तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांचा अपमान करणाऱ्या नागपूर येथील प्रशांत कोरटकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्याविरोधात कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या व इतर नागरिकाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे.या वेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद‌ भाऊ मैद, संभाजी टेटर, विश्वजीत सरनाईक प्रभाकर टेटर, ॲड.प्रशांत देशमुख ॲड.भारत जाधव नितीन पवार प्रवीण कदम,सुशांत महल्ले, अनिल चव्हाण, गणेश पावडे, कांबळे, विश्वजीत सरनाईक, अभिजीत पानपट्टे, पंडित देशमुख, दिपक उखळकर शिवाजी कदम, सुरेंद्र ब. बनकर हि.ए मांडवकर, गजानन काकडे सतिष जाधव, राजु डहाके संतोषराव तावडे उत्तमराव कदम विजय बाबर,गजानन जाधव, अदी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close