संजय कोल्हे यांची गोवा येथे होणाऱ्या नॅशनल गेमसाठी रोलबॉलचे प्रशिक्षक म्हणून निवड!

यवतमाळ/प्रतिनिधी:-स्कुल ऑफ स्कॉलर्सचे शारीरिक शिक्षक विभाग प्रमुख व रोलबॉल स्केटिगचे राष्ट्रीय प्रशिक्षक व जिल्हा रोलबॉलचे सचिव संजय कोल्हे यांची गोवा येथे होणाऱ्या रोलबॉल खेळाच्या नॅशनल गेमसाठी निवड झाली असुन संघाला प्रशिक्षण देण्यासाठी दि १५ ते २७ ऑक्टोबर २३ दरम्यान शिवछत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी पुणे येथे प्रशिक्षण शिबीर असून तसेच दि.२९ ते २ नोव्हे २३ दरम्यान गोवा येथे रोलबॉल स्पर्धेचे आयोजन असून महाराष्ट्राचा मुला व मुलीचा संघ सहभागी होणार आहे .
प्रशिक्षक कोल्हे यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, रोलबॉलचे जनक राजु दाभाडे. महाराष्ट्राचे रोलबॉलचे सचिव – प्रताप पगार , अमित पाटील , प्रभाकर वडवेराव , पंकज शेलोटकर, अभिजीत पवार, महेश गहूकार , हर्षा इंगळे, रोशनी घूरडे यांना दिले.कोल्हे सर यांचे जिल्हा क्रिडा अधिकारी संजय पांडे, क्रिडा अधिकारी चैताली राऊत , शाळेचे प्राचार्य नरेन्द्रसिगं चौव्हाण, उपप्राचार्य रिना काळे, सुपरवायझर सायली कशाळकर, डॉ. प्रा. विकास टाेणे, प्रशासकीय अधिकारी भैरोबा मुंजाळ ‘ दादा भोरे , रफीक सर , सचिन भेंडे , जितु भाऊ , महेश पडोळे , किशोर चौधरी.महेश उबे – आर एस . एस . ऐ सचिव तसेच शाळेच्या शिक्षक कर्मचाऱ्यासह सर्व स्तरातून अभिनंदन केल्या जात आहे.



