संबंधित प्रशासनाच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेला बेकायदा घातक पेट्रोल पंप इतरत्र हलविण्याची मागणी!

पुसद :शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाला लागून असलेला बेकायदा पेट्रोल पंप वर्षानुवर्षे नियमबाह्य पद्धतीने सुरू आहे. सदर पेट्रोल पंपाच्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असल्याने या चौकात नेहमीच नागरीकांची वर्दळ असते तर या चौकात नेहमी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तर जवळच श्री शिवाजी शिक्षण संस्था असून दुकान गाळे आहेत हा चौक नेहमी ये-जा करणाऱ्या प्रवासी नागरिकांमुळे गजबजलेला असतो परंतु या चौकाला लागून असलेला रहदारीच्या ठिकाणी पेट्रोल पंपावर अतिज्वलनशील पदार्थाची हाताळणी अतिशय काळजी पूर्वक घ्यावी लागते पण यात पेट्रोल पंपावर हजारो लिटरचा साठा आहे पण या पेट्रोल पंपावर मात्र खुल्या पद्धतीने बाटली -डबकीत पेट्रोल -डिझेल नियमांची पायमल्ली करून डिझेल-पेट्रोल विक्री केल्या जाते त्यामुळे या पेट्रोल पंपावर सुरक्षेच्या नियमाच्या अक्षरशः चिंधड्या उडविल्या जात आहे. अशा सार्वजनिक ठिकाणी पंपाची जागा धोकादायक ठरते, भविष्यात मोठा अपघात किंवा मनुष्यहानी किंवा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु सदर पेट्रोल पंपाची लीज संपूनही हा पेट्रोल पंप संबंधित नगरपरिषद व महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने बेकायदा सुरू असल्याने सदर पेट्रोल पंप चालकाविरुद्ध तात्काळ कारवाई करून हा पेट्रोल पंप शहराच्या बाहेर हलविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने करण्यात येत आहे.
याबाबत माहिती अशी की, पुसद शहरातील सार्वजनिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकाला लागून बेकायदा पद्धतीने वर्षानुवर्षे भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप असून हा पेट्रोल पंप सरकारच्या नियंत्रणाखाली चालते त्यामुळे या कंपनिच्या पेट्रोल पंपासाठी काही मार्गदर्शन तत्वे (मार्केटिंग गाईडलाईन्स) देण्यात आले आहेत परंतु संबंधित प्रशासनाकडून मात्र या नियमाचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात एक किलोमीटरच्या आत दोन पेट्रोल पंप नसावे असा नियम असताना सुद्धा या नियमांची सर्रासपणे पायमल्ली केली जात आहे. पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वर्षानुवर्ष सुरू असलेला बेकायदा पेट्रोल पंप संबंधित प्रशासनाच्या आशीर्वादाने नियमबाह्य पद्धतीने सुरू आहे. सदर पेट्रोल पंपाच्या बाजूला सार्वजनिक ठिकाण असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य पूर्णाकृती पुतळा असल्याने या चौकात नेहमीच नागरीकांची वर्दळ असते तर या चौकात नेहमी विविध कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तर एकीकडे हाकेच्या अंतरावर श्री शिवाजी शिक्षण संस्था असून आजूबाजूला दुकान गाळे आहेत हा चौक नेहमी ये-जा करणाऱ्या प्रवासी नागरिकांनी गजबजलेला असतो परंतु या चौकाला लागून असलेला रहदारीच्या ठिकाणचा पेट्रोल पंपावर अतिज्वलनशील पदार्थाचा हजारो लिटरचा साठा आहे त्यामुळे या पदार्थाची हाताळणी अतिशय काळजी पूर्वक घेणे लागते पण या पेट्रोल पंपावर मात्र खुल्या पद्धतीने बाटली -डबकीत पेट्रोल-डिझेल नियमाची पायमल्ली करून या अतिज्वलनशील पदार्थाची विक्री केल्या जाते त्यामुळे या पेट्रोल पंपावर सुरक्षेच्या नियमाच्या अक्षरशः चिंधड्या उडविल्या जात आहे.अशा सार्वजनिक ठिकाणी पंपाची जागा धोकादायक ठरते, त्यामुळे भविष्यात मनुष्यहानी किंवा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकीकडे ह्या पेट्रोल पंपाची लीज संपूनही बरेच वर्षे झाले तरीही हा पेट्रोल पंप अवैधरीत्या सबंधित नगरपरिषद व महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने बेकायदा सुरू असल्याने सदर पेट्रोल पंप चालकाविरुद्ध तात्काळ कारवाई करून हा पेट्रोल पंप शहराच्या बाहेर हलविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने करण्यात आली आहे जर भविष्यात या पेट्रोल पंपामुळे नागरिकांच्या जीवित्वास धोका किंवा वित्तहानी झाल्यास संबंधित नगरपरिषद प्रशासन व महसूल प्रशासन जबाबदार राहील त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने
हा पेट्रोल पंप पंधरा दिवसाच्या आत शहराबाहेर हलविला नाही तर सामाजिककर्त्याच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.