गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई!

पुसद: दि.३फेबुवारी२०२४ रोजी गोपिनिय शाखा यवतमाळ पुसद, उमरखेड उपविभागात जिल्हा दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहपोलीस निरीक्षक गजानन गजभारे हे रात्री गस्तीवर असताना या दिवशी मंगरुळपिर जि.वाशिम येथुन पिकप बलोरो एमएच३७टि२५९४ या वाहानातुन गोवंशियांच्या मांसाची विक्रीसाठी मनोरा, दिग्रस,सिंगल, पुसद,शेंबाळप्रीप्री मार्ग निजामबादकडे जात असल्याची माहिती मुखबिरामार्फत मिळाल्यानंतर खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवळनी पआलपट गावाजवळील रस्त्यावर सापळा रचून नाकाबंदी केली असता त्या वाहनात मोठ्या प्रमाणावर गोवंशी मास आढळून आल्याने पिकप बोलेरोसह गोवंशीय मास जप्त करून दोघांना ताब्यात घेऊन खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
यवतमाळ जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हें, आरोपीचा शोध, अवैध जनावर तस्करी व मांस वाहतुक करणाऱ्याचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते, त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बावत सूचना दिल्या आहेत. दि.३ फेब्रुवारी २०२४ रोजी सहा पोलीस निरीक्षक गजानन गजभारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद, उमरखेड उपविभागात जिल्हा दरोडा प्रतिबंधक रात्रगस्ती पेट्रोलीग करीत असतांना मुखबोरव्दारे गोपनिय माहीती प्राप्त झालो कि मंगरुळपिर जि.वाशिम येथे एक पिकअप कलोरा बाहन क्रमांक एम एच३७टी२५९४ यामधून बैल गायी (गोमांस) कत्तल करुन मानोरा, दिग्रस, सिंगद, पुसद, शेंबाळप्रीप्री मार्ग निजामाबाद येथे घेवून जात असल्याची खात्रीशिर माहीती मिळाल्याने नमूद खालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचाना सोबत घेवून खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवळणी पालमपट गावाजवळ रस्त्यावर सापळा लावून नाकाबंदी केली असता पुसदच्या बाजूकडून संशयीत पिकअप बोलेरो येत असल्याचे दिसून आल्याने त्यास रस्त्याच्या बाजूला थांबवून त्याची पंचा समक्ष पाहणी केली असता सदर पिकअप बोलोरो वाहन क्रमांक एम एच३७टी२५९४ या मध्ये लोखंडी टाकी, त्यावर फळ विक्री व वाहतुक करोता उपयोगात येणारे कैरेट ठेवून त्याखाली लोखंडी टाकी त्यामध्ये १५ ते १६ बैलांचा (गोमांस) मांस मिळून आल्याने सदर टेम्पो चालक १) मोहम्मद कलीम अब्दुल गणी वय ३६ वर्ष, २) मोहम्मद शहजाद मोहम्मद अकिल वय २१ वर्ष, दोन्ही रा. मंगरुळपिर जि.वाशिम असे असून सदरचा बोलोरोमध्ये मांस सेख इरशाद शेख वजिर रा. टेकडी पुरा अक्सा मस्जीद, जवळ कसाबपुरा मंगरुळपिर जि. वाशिम यांच्या सांगण्यावरुन निजामाबाद येथे घेवून जात असल्याचे सांगितल्याने पिकअप बोलेरो वाहुन, तसेच २०१० किलो मांस (गोवंश), एक मोबाईल असा एकूण १४१००००/- रु माल जप्त करुन वरील इसमां विरुध्द खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि रेवन जागृत पोहवा तेजाव रणखांच, पोहवा सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनिल पंडागळे, मोहम्मद ताज सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.