‘‘रॅंगिंग समाजासाठी धोकादायक’’ मा.श्री व्ही.बी. कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश-१, यवतमाळ यांचे प्रतिपादन..

यवतमाळ /प्रतिनिधी:मा.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांचे निर्देशानुसार व मा. श्री नागेश वि. न्हावकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व पी. वाधवाणी काॅलेज आॅफ फार्मसी, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने दि,७ आॅगष्ट, २०२४ रोजी दुपारी २:०० वाजता ‘‘रॅंगिंग’’ या विषयावर जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मा. श्री व्ही.बी. कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश-१, यवतमाळ हे होते. तर प्रमुख वक्ते मार्गदर्शक मा. श्री के.ए. नहार, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर, यवतमाळ हे लाभले. सदरील कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थीती म्हणुन मा. डाॅ. अनिल चांदेवार, प्राचार्य पी. वाधवाणी काॅलेज आॅफ फार्मसी, यवतमाळ हे उपस्थीत होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. डाॅ. अनिल चांदेवार, प्राचार्य, पी. वाधवाणी काॅलेज आॅफ फार्मसी, यवतमाळ यांनी केले.कार्यक्रमाचे वक्ते मा. श्री के.ए. नहार, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर, यवतमाळ यांनी रॅंगिंग कायद्याबाबत उल्लंघन करण्या-या मुला मुलींना २ वर्ष कारावास व दंडाची शिक्षा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच रॅंगिंग करणारे विद्यार्थी यामध्ये आढळल्यास 5 वर्षापर्यंत कुठल्याही संस्थेत प्रवेश मिळत नाही, महाविद्यालयातुन सुध्दा काढल्या जाते. सर्व महाविद्यालयामध्ये अॅंटी रॅंगिंग कमिटी स्थापन असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. अॅटी रॅंगिंग संबधात काही अडचण असल्यास टोल फ्री क्रमांक१८००१८०५५२२ वर संपर्क करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ या कार्यालयामार्फत पुरविण्यात येणा-या मोफत कायदेविषयक सल्ला व सहाय्य याबाबत विस्तृत अशी माहिती सुध्दा दिली.शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मा. श्री व्ही.बी. कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश-१, यवतमाळ यांनी रॅंगिंगमध्ये एखादया मुला मुलींकडुन दुस-या मुलांसमोर अपमानास्पद वागणूक देणे, छळ करणे, एखादया मुला मुलीला त्यांच्या मनाविरूध्द कृत्य करण्यास भाग पाडणे, त्यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण करणे, अमानवीय गैर प्रकार करून घेणे, अशी कृती करणे ज्यामुळे मुलांमुलीमध्ये मानसिक दडपण येईल अशा बाबीं हया रॅगिंगमध्ये येतात याबाबत विस्तृत अशी माहिती यावेळी दिली. जर एखादया मुलांवर रॅंगिंग झाली असेल तर त्यांनी आपल्या महाविद्यालयामध्ये असलेल्या अॅंन्टी रॅंगिंग स्काॅड मध्ये तक्रार दयावी व त्या तक्रारीचे सदर स्काॅड यांना ,७ दिवसामध्ये अहवाल सादर करावा लागतो याबाबत विस्तृत अशी माहिती दिली.सदरील जनजागृती शिबीराचे सुत्रसंचालन मा. श्रीमती मैमुन बाॅम्बेवाला, प्राध्यापक, व आभारप्रदर्शन मा. श्रीमती शिल्पा गावंडे, प्राध्यापक, पी. वाधवाणी काॅलेज आॅफ फार्मसी, यवतमाळ यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व विद्याथ्र्यीनी सदर कायदेविषयक शिबीरास उपस्थीत होते.



