राजकिय

पुसद विधानसभा मतदारसंघ आजही विकासापासून कोसो दूर;शरद मैंदं जनतेसाठी एक आश्वासक आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून पुढे.!

पुसद: मतदारसंघात राकाँ ( शरदचंद्र पवार)पक्षाचे नेते शरद मैद हे तळागाळातील जनतेसाठी एक आश्वासक आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून उदयास पुढे येत आहे अशी चर्चा मतदार संघात सुरू आहे.पुसद मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद मैंदं हे विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले तरीही खचुन न जाता कींवा ‘घरात बसू न राहता’ तळागाळातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या समस्या व प्रश्न एकूण घेण्यासाठी लोकांमध्ये जाऊन झंझावात दौरे करून त्याचा पाठपुरावा शासनदरबारी प्रशासनाकडे करीत आहेत.पुसद मतदार संघ म्हणजे नाईक घराणे, असे समीकरण झाले आहे. १९५२ पासून या मतदारसंघावर नाईक घराण्याचे वर्चस्व आहे. नाईकांच्या या अभेद्य गडाला आजपर्यंत कुणीही खिंडार पाडू शकले नाही. विरोधकांनी नाईकांच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला नाही व विरोधक कधीही त्यात यशस्वी झाले नाही अखेर वर्षानुवर्षे विरोध करणारे नाईकांच्या दावणीला बांधले गेले म्हणजे ते आजही युतीतच आहेत.त्यामुळे येथे विरोधी पक्ष कधीच सक्षम दिसत नव्हता त्यामुळे बंगल्यातून सर्व राजकीय सूत्र चालविली जात होती. सहकार असो की नगरपरिषद,जिल्हा परिषद, पंचायत समिती नाईकांचा शब्द तेथे प्रमाण मानला जात होता. आदिवासी व बंजाराबहुल या मतदारसंघात इतर समाजाचेही मोठे समर्थन नाईकांनाच मिळत होते.पुसद मतदारसंघाला १९५२ पासून सत्तेचे वैभव आहे. त्यातही हा भाग वनसंपत्ती, शेती आणि पाण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. व्यवसाय, उद्योगधंदे, शेती या दृष्टीने मोठी बाजारपेठ आहे. एवढे असूनही सत्ताधाऱ्यांच्या दूरदृष्टीचा अभाव, नियोजनाची कमतरतेमुळे हा मतदारसंघ विकासापासून कोसो दूर असल्यामुळे मोठी खंत आहे.या राज्याला या मतदारसंघाने दोन मुख्यमंत्री दिले परंतु हा मतदारसंघ नाईक साहेबांच्या दूरदृष्टीने काही काळ पुढारला होता परंतु त्यांच्या वारसदारांच्या दूरदृष्टीचा अभाव व नियोजनशुन्य कारभरामुळे हे वैभव फार काळ त्यांना टिकवता आले नाही. रोजगाराचे स्त्रोत आटले आहेत. कापड गिरणी, साखर कारखाने, जिनिंग प्रेसिंग, दूध डेअरी, व्यवसाय, सहकार तत्वावर चालणाऱ्या दूध संस्था अशा भक्कम पायाभरणीने उद्योग, शिक्षण क्षेत्र एकेकाळी विस्तारला होता. त्यामुळे रोजगाराने गजबजलेलं हे शहर सद्यस्थितीत पूर्णत: बकाल झाले आहे. रोजगाराचे स्त्रोत आटले आहेत. सुत गिरण्या, साखर कारखाने, जिनिंग प्रेसिंग, दूध डेअरी, व्यवसाय, सहकार तत्वावर चालणाऱ्या दूध संस्था अशा भक्कम पायाभरणीने उद्योग, शिक्षण क्षेत्र विस्तारलेले वैभव काही विकून मोकळे झाले आहे तर काहीच्या फक्त या क्षेत्रात स्मृती उरल्या आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ विकासापासून आजही कोसो दूर आहे.आज हजारो हाताना काम आणि पोटाला भाकर देणारा हा उद्योग पूर्णत: मोडकळीस येवून नास्तानाबुत झाला आहे. गेल्या अनेक वर्षांत पुसद तालुक्यात एकही मोठा उद्योग उभा राहिला नाही. उलट जुन्या संस्थांपैकी काही बंद पडल्या तर काही मरणासन्न अवस्थेत गेल्या आहे. हाताला काम नसल्यामुळे दरवर्षी या मतदारसंघातून ५० ते६० हजारांच्या वर मजूर मेट्रो सिटी महानगरांकडे ऊस तोडणी किंवा वीटभट्टी च्या कामाच्या शोधात जातात. मतदारसंघाच्या विकासाची नांदी ठरणाऱ्या औद्योगिक वसाहतींचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. शासन तरुणांना उद्योजक होण्याचे आवाहन करते. पण पुसद येथे उद्योगधंद्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधांची पूर्तता नसल्याने औद्योगिक वसाहतीतील अनेक भूखंड अद्यापही ओसाड पडले आहे. फक्त बोटावर मोजण्याइतपत लघू-मध्यम स्वरुपाचे उद्योगधंदे येथे घरघरत असल्याने मतदार संघातील औद्योगिक विकासाचे स्वप्न भंगले आहे.हरितक्रांतीची आणि जलसंधारणाची राज्याला प्रेरणा देणाऱ्या नाईक घराण्यातील वारसांना या विचारांचा पूर्णपणे विसर पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
शेतकरी कारखानदार झाला पाहिजे हे कै. वसंतराव नाईक यांचे ब्रिद वाक्य असतांनाही त्यांच्या कर्मभूमीतील शेतकरी ऊसतोडीसाठी व वीटभट्टी च्या कामासाठी व इतर कामांसाठी वणवण फीरत असून अनेक प्रश्नांमुळे त्रस्त आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माळ पठारावरील नागरिकांच्या उशाला धरण असून सुद्धा त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर शेतीचा प्रश्न सोडाच? पुसद विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक हे विधानसभेच्या निवडणुकीत १ लाख २७ हजार ९६४ मते घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार शरद आप्पाराव मैद यांचा पराभव केला होता. व ते राज्यमंत्री झाले तरीहीआता या बालेकिल्ल्यात लक्ष घालण्याची गरज आहे.मात्र या मंत्रीमहोदयांना जास्त खाते मीळाल्याने या मतदारसंघाची बिकट अवस्था झाली असून “आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातय” अशी अवस्था झाल्याने हा मतदारसंघाचे विकासाचे स्वप्न भंगले आहे.पंरतु याच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शरद मैंदं यांनी इंद्रनील नाईक यांच्या विरोधात निवडणूक लढवून पराभूत झाले पण ते पराभवाने खचुन न जाता कींवा घरात न बसता किंवा विरोधाला विरोध म्हणून न करता मतदारसंघांतील प्रत्येक गावात वाड्पायात ड्यात तांड्यात
जाऊन सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत त्यांच्या वतीने जे जे मदत करता येते ती मदत समस्याग्रस्त शेतकरी असो की, सर्व सामान्य नागरिक असो अशांना फुलनां फुलाची मदत करीत असून त्यांच्या समस्या शासन दरबारी शासन प्रशासनाकडे मांडतआहेत व त्यांचा मतदार संघात झंजावत सुरू असून संपूर्ण मतदारसंघ ढवळून काढत आसल्याने या शरद मैंदं यांच्या नेतृत्वाने या मतदारसंघात नवीन राजकीय नेतृत्व उदयास येत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत असून त्यांचे या मतदारसंघात कौतुक केले जात आहे.

 

शरद मैंदं यांचा पुसद मतदारसंघात झंझावात.. 

आखणी,पदयात्रा, धारदार मुद्दे आणि शेतकरी  सर्वसामान्य नागरिकांच्या भेटीगाठीच्या धडाक्याने विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद मैंदं यांनी राजकारणात पाऊल ठेवताच मतदारसंघात झंझावात सुरूच ठेवला आहे. त्यामुळे त्यांना ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या नेत्यांला कार्यकर्त्यांचा सामान्य जनतेचा पाठिंबा मिळत असुन  त्यांच्या पक्षासाठी व महाविकास आघाडी साठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.त्यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदार संघातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात तसेच नगरपरिषद मधील वार्डावार्डात कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकाच्या भेटीगाठीवर भर दिल्यामुळे सर्वसामान्य जनतेत त्यांचा चांगलाच प्रभाव वाढत आहे. स्थानिक पातळीवरील पाणीटंचाई, वाहतूक समस्या आणि नागरी सुविधा सुधारणा घनकचरा शेतकऱ्यांच्या संदर्भातील मुद्द्यांवर तसेच ग्रामीण भागातील विकासकांच्या प्रश्नावर भर दिला आहे. परंतु या भागातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी व त्यांना मार्गदर्शन मिळावे या हेतूने नाईक साहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तत्कालिन सरकारने त्यांचा सन्मान म्हणून पुसद शहरात त्यांचे भव्यदिवे समारक उभे राहावे यासाठी राज्य शासनाने तब्बल ९ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. याशिवाय गहुलीच्या स्मृतिस्थळ विकासासाठी दोन कोटींचा निधीसह एकूण १२ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला. त्यानंतर २०१६ मध्ये काकडदाती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वसंत उद्यानाच्या या जागेवर स्मारकाचे निर्माण कार्य सुध्दा पूर्ण झाले.मात्र गेल्या पाच ते सात वर्षांपासून हे स्मारक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे १ जुलै रोजी कृषी दिनानिमित्त शरद मैंदं यांनी नाईक साहेब यांच्या स्मारकाजवळील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व या स्मारकाची झालेली दुर्दशा व हे स्मारक कित्येक काळापासून राजकीय उदासीनतेमुळे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव जनते समोर आणले.. जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध नेतृत्व म्हणून शरद मैंदं यांच्याकडे जनतेसाठी एक आश्वासक आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत, अशी चर्चा मतदारसंघासह शहरात चर्चिली जात  आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close