पुसद तालुका गणित अध्यापक मंडळाची कार्यकारणी गठीत!जिल्हा संघटकपदी शिवशंकर घरडे, तालुकाध्यक्ष पदी जयवंत मोठे तर तालुका सचिवपदी उमेश इंगळे यांची निवड!

पुसद : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न यवतमाळ जिल्हा गणित अध्यापक मंडळ तर्फे पुसद तालुका गणित अध्यापकांची सहविचार सभा नुकतीच पुसद येथे संपन्न झाली. या सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष अभय पारखी हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विनोद संगीतराव माजी जिल्हाध्यक्ष गणित अध्यापक मंडळ हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे माजी सचिव विजय विसपुते, प्रकाश भुमकाळे जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक संघ, नीरज डफळे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा शालेय कर्मचारी पतसंस्था विशेष अतिथी म्हणून नागोराव चौधरी मार्गदर्शक गणित अध्यापक महामंडळ, भारत गारघाटे माजी सचिव शालेय कर्मचारी पतसंस्था, संजय देवाळकर मुख्याध्यापक कुंभा, विठ्ठल परांडे सहसचिव मुख्याध्यापक संघ, मिलिंद पांडे माजी अध्यक्ष गणित अध्यापक मंडळ, देशमुख सर संचालक संचालक शालेय कर्मचारी पतसंस्था, माझी प्राचार्य पंजाबराव सुरोशे, विज्ञान मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पोले,बंडू खराटे जिल्हा उपाध्यक्ष गणित अध्यापक मंडळ, मंदा पान्हेकर जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा महिला प्रतिनिधी, व्यासपीठावर हजर होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन तथा भारतीय थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरुवात झाली. मान्यवराच्या स्वागतानंतर माननीय विजय विसपुते सर व विनोद संगीतराव सर, देशमुख सर यांनी उपस्थित गणित शिक्षकांना गणित- अध्यापना विषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात अभय पारखी सर यांनी जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी गणिताच्या विविध परीक्षांचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर मान्यवरांनी यवतमाळ जिल्हा गणित अध्यापक मंडळात जिल्हा संघटक पदी शिवशंकर घरडे यांची नियुक्ती केली. सोबतच पुसद तालुका गणित अध्यापक मंडळाचे नवीन कार्यकारणी देखील गठित केली. त्यात तालुका अध्यक्ष पदी जयवंत मोटे ,तालुका सचिव पदी उमेश इंगळे, उपाध्यक्षपदी बबन कटके सतीश दुबे, रमेश चव्हाण कु. मंदाडे मॅडम, सहसचिव पदी सतीश जाधव, भीमराव उंदरे, मनीष जयस्वाल, कोषाध्यक्ष पदी प्रवीण तगडपल्लेवार संघटक पदी निलेश वानखेडे, राजेश बुरबुरे , शाहिद खान , सच्चिदानंद दुधे सर ,महिला प्रतिनिधी म्हणून श्वेता बुरकुले, माधुरी देशमुख , सदस्य म्हणून मिलिंद राठोड,दत्ता शिंदे, मिलिंद मंदाडे, दुर्गेश ओझा , माधुरी धर्माधिकारी, दीपक घाटूळ, अर्चना भगत , सल्लागार म्हणून संजय चेके , संतोष सोनोने , रिजवान सर ,मार्गदर्शक म्हणून पंजाबराव सुरोशे, दीपक वाकडे, गजानन चिंतावार या सर्वांची नियुक्ती केली. गणित अध्यापक मंडळाच्या नवीन कार्यकारणीत निवड झालेल्या गणित शिक्षकांची उपस्थित सर्वांनी अभिनंदन तथा कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या सभेचे सूत्रसंचालन सतीश जाधव सर यांनी केले तर आभार जयवंत मोटे यांनी मानले. या सभेला पुसद तालुक्यातील गणेश शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



