ईतर

पुसद शहरात रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा मिरवणूक प्रचंड उत्साहात साजरी!

शोभा यात्रेतील प्रमुख आकर्षण महाकाल अघोरी तांडव नृत्य हा जिवंत देखावा...

पुसद: शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सगळीकडे श्रिरामनवमीचा उत्सव जल्लोष पाहायला मिळाला श्रिरामनवमी निमित्त अवधी पुष्पांवती नगरी रामनामाच्या गजराने दुमदुमूली शहरातील चौकाचौकात भगव्या पताका कमानी उभारण्यात आल्या होत्या त्यामुळे संपूर्ण शहर भगवेमय झालेले दिसले. दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास येथील हटकेश्वर वार्ड येथील जुन्या राम मंदिरात जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

याप्रसंगी किर्तन, आरती झाल्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.अनेक ठिकाणी अनेक रामभक्त दर्शनासाठी एकत्र जमले. शहरातील अनेक वार्डात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात वाटप सुरू होते दुपारी ३ :०० वाजण्याच्या सुमारास विश्व हिंदू परिषद व प्रभु श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा व मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला.यामध्ये श्री रामचंद्रांची पालखी, ढोलपथक, वाशिम जिल्ह्यातील श्रीहरिहर वारकरी शिक्षण संस्थेचे भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, दुर्गावाहिनी पथकासह डिजे ढोल पथक, अयोध्यास्थित राममंदिराची झाँकी, अयोध्या येथील बालस्वरुपातील प्रभु श्रीरामांची मुर्ती, महादेवाची भव्य मुर्ती, अहिल्यादेवी होळकर, बिरसा मुंडा, संत सेवालाल महाराज यांच्या झाँकी, श्रीराम, लक्ष्मण व माता सीता यांच्या वेशभूषेतील झाँकी अशा विविध झाँकी शोभायात्रेच्या विशेष आकर्षण ठरल्या.

यामध्ये विशेष म्हणजे शोभा यात्रेतील प्रमुख  आकर्षण असलेल्या महाकाल अघोरी तांडव नृत्य प्रयोग हा जिवंत देखावा पाहण्यासाठी अबाल वृद्ध, बाल गोपाळांसह महिलांची शहर व तालुक्यातून अफाट गर्दी झाली होती. अघोरींचे नृत्य पुष्पावंतीकरांनी काल पहिल्यांदा पाहिले.

यावेळी शहरातील सर्व रस्ते दुतर्फा गर्दीने भरले होते.प्रभु श्रीराम व सीतामातेची वेशभूषा धारण केलेल्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ढोलपथक व डिजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता. शोभायात्रे दरम्यान ठिकठिकाणी महाप्रसाद व शरबतचे वितरण करण्यात आले. सदर शोभायात्रा हटकेश्वर वार्डस्थित जुन्या राम मंदिरापासून निघून चौबारा चौक, देवकृपा चौक, नगिनाचौक, कापड लाईन, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौक ते मुखरे चौक, स्व.वसंतराव नाईक चौक ते गजानन महाराज मंदिर येथे रात्री महाआरती होऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली.zep news media

शोभायात्रा व मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात रामभक्तांची गर्दी उसळली होती. या वेळी पोलीस प्रशासनाचे उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close