पुसद शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गांजा अंमली पदार्थ विक्री करणा-या तिघांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची एनडीपीएस कायदया अंतर्गत कारवाई!

पुसद/ प्रतिनिधी : यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो. से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्त पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.दि.३० ऑगस्ट २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, पोलीस स्टेशन पुसद शहर हददीतील मौजे के.डी. जाधव तांडा शेजारी शेतालगत गुलजमान ऊर्फ भु- या खान व त्याचे इतर दोन साथीदार हे गांजा अंमली पदार्थ स्वत:च्या ताब्यात बाळगुन विक्री करीत आहे. अशी माहीती मिळाल्याने संदर्भात प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन मौजे के.डी. जाधव तांडा येथे लावलेले सापळा कारवाई दरम्यान इसम नामे १) गुलजमान ऊर्फ भु-या खान अलीयार खान वय ४५ वर्ष रा. गढीवार्ड पुसद ता. पुसद जि. यवतमाळ २) शेख फिरोज शेख समशेर कुरेशी वय ४५ वर्ष, रा. अशोकनगर यवतमाळ ता.जि. यवतमाळ ३) सैफअली खान सफीउल्ला खान वय २६ वर्ष रा. अखेरतनगर कबरस्तानच्या बाजूला पुसद ता. पुसद जि. यवतमाळ असे संशयीतरित्या दिसून आल्यान े त्यांना ताब्यात घेवून त्याचेकडील एक पल्सर मोटार सायकल वरील गुलाबी रंगाच्या पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये २ किलो१७६ ग्रॅम गांजा अंमली पदार्थ मिळून आल्याने ते जप्त करुन त्यांचेकडील, मोबाईल, पल्सर मोटार सायकल तसेच गांजा अंमली पदार्थ विक्री करीता असलेले साहीत्या असे एकूण किंमत १६४१२०/- रु चा मुददेमाल जप्तीसह नमूद इसमा विरुध्द अमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम १८८५ चे कलम ८(सि), २० (बि), (बि) अन्वये पोलीस स्टेशन पुसद शहर येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या, गुन्ह े उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चटन करण्यास प्रतिबध्द असुन यापुढ े यासंबंधी माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलीसाची कोणतीही भिती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सहकार्य करावे ही विनंती.सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो. से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो. से) सा तसेच मा. सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हर्षवर्धन बी जे सा, (भा.पो. से) सा मा. पोलीस निरीक्षक सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सहा पोलीस निरीक्षक धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, सफो मुन्ना आडे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा / तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोहवा / कुणाल मुंडोकार, पोशि सुनिल पंडागळे, चा पोउपनि रविंद्र शिरामे, चापोशि राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



