क्राइम

पुसद शहर दुहेरी हत्याकांडाने हादरले; शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसद : शहरात बुधवारी दि. १९जुलै२०२३रोजी मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास ईटावा वार्ड येथे दुहेरी हत्याकांडाने शहर हादरले. सोबत राहणाऱ्या मित्रांनीच तिन सख्ख्या भावांवर प्राणघातक हल्ला केल्याने त्यामध्ये दोघेजण जागीच ठार झाले तर या हल्ल्यात तिसरा भाऊ गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.हात्याकांड घडवून आरोपी पसार झाले आहेत.

राहुल हरिदास केवटे वय ४५वर्ष, क्रीसस हरिदास केवटे वय २३वर्ष अशी मृतांची नावे आहेत, तर बंटी हरिदास केवटे वय ४०वर्ष हा गंभीर जखमी आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मय्यताचे नातेवाईक व पुतण्या नयन केवटे वय १७ वर्ष यांनी शहर पोलीस स्टेशन पुसद येथे दिलेल्या फिर्यादीवरून बुधवार दि. १९ जुलै२०२३रोजी रात्री १०ते१०:३० वाजण्याच्या सुमारास ईटावा वार्ड येथील रहिवासी असलेल्या केवठे कुटुंबिय आपल्या घरासमोर अंगणात बसून असतानाच वॉर्डातील आरोपी गणेश तोरकड, यांच्यांत वाद झाला व तो वाद चिघळला आरोपींने मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास मित्रांना सोबत घेऊन पवन वाळके, निलेश थोरात, गणेश तोडकर, गणेश कापसे, गोपाल कापसे, अवि चव्हाण मित्राच्या साह्याने केवटे परीवार झोपेत असताना प्राण घातक हल्ला चढवला त्यातच दोघांचा जागीच मृत्यू झाला.तर एकजण गंभीर जखमी झाला या जखमीला तात्काळ यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.आरोपी हात्याकांड घडवून पसार झाले आहेत. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीसांंनी आरोपीच्या शोधघेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे व शहर पोलीस स्टेशनचे पथके रवाना केले आहेत. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून उत्तरिय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने पंचकोशीत खळबळ उडाली असून सध्या शहरातील वातावरण शांत आहे. सततच्या खुनाच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे.पोलीसांनी आरोपी विरुद्ध कलम ३०२ ॲट्रॉसिटी ॲक्ट खुनाचा प्रयत्न अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून सदर हत्याकांड प्रकरणाचा अधिक तपास पुसद उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर व पोलीस कर्मचारी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close