ईतर
प्रा.सुरज नरसिंग यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवी बहाल!

पुसद : येथील फुलसिंग नाईक कनिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात कार्यरत असलेले प्रा. डॉ. सुरज विनोद नरसिंग याना नुकतीच पार पडलेल्या ४२ वा दीक्षांत समारंभात रसायनशास्त्र विषयात आचार्य पदवी बहाल केली. त्यांचा संशोधनाचा विषय “लिव्हास्टोना चायनासिस व बेंगलुडोसा पार्किंया यांच्या सुक्ष्मकनांचे संशोधन” प्रा. डॉ. सुबोध भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर केला होता.
त्यांना मिळालेल्या यशाबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयभाऊ नाईक,संस्थेचे सचिव तथा माजी मंत्री मनोहरराव नाईक फुलसिंग नाईक महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.प्रल्हाद वावरे, प्रबंधक श्री.उमेश चव्हाण, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षक कर्मचारी वृंद तसेच मित्र वर्ग,नातेवाईक या सर्वांनी भरभरून कौतुक केले आहे ते या यशाचे श्रेय आई वडिल यांना देतात..



