प्रज्ञासूर्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनपर्व आयोजन समिती पुसद २०२६च्या अध्यक्षपदी लक्ष्मण कांबळे यांची सर्वानुमते निवड!

पुसद : प्रज्ञासूर्य महामानव डॉ. बाबासाहेब आबेडकर यांची जयंती जागर मानवतेचा म्हणून सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे याच निमित्ताने दि, ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ८:००वाजता युनियन बँक चौक परिसरातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव प्रबोधनपर्व आयोजन समिती पुसद २०२६ च्या अध्यक्षपदासाठी समाजबांधवांच्या वतीने सभा बोलावण्यात आली होती.यासभेला प्रज्ञापर्व समितीचे माजी अध्यक्ष विश्वास भवरे, प्रा.कल्याण साखरकर,तसेच प्रा.मिलिंद सोमकुंवर, ॲड.यादवराव जाभुंळकर, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाअध्यक्ष गणपत गव्हाळे, बामसेफ चे संतोष सुरवाडे, भगवान हनवते, दीपक कांबळे, अविनाश भवरे,भारत कांबळे,बंडू गंगावणे, रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाश धुळे,प्रा.अंबादास वानखडे,व्हडगिर सर,भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव,नितेश खंदारे,भास्कर बनसोड,गुरू उचाडे,सह जेष्ठ विचारवंत मंडळी,तथा विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 
उपस्थित असलेल्या ज्येष्ठ मंडळींनी प्रबोधनपर्व समितीच्या पुढील नियोजनतील कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले आणि शेवटी लक्ष्मण सदाशिव कांबळे यांची प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव प्रबोधनपर्व आयोजन समिती २०२६ च्या अध्यक्षपदी सर्वांच्या एकमताने निवड करण्यात आली.. तसेच मावळते अध्यक्ष २०२५ चे आयुष्यमान संतोष आंभोरे यांचे स्वागत करून त्यांना निरोप देण्यात आला यावेळी उपस्थित समाजबांधव तथा विविध सामाजिक कार्यकर्ते व संघटनेचे पदाधिकारी हजर होते.



