पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध देशी गावठी कट्टा बाळगणारा पोलिसाच्या जाळ्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई!

पुसद: ग्रामीण पोलीस स्टेशन हददीतील मौजे लोनवाडी फाट्याजवळ बेकायदेशीर देशी गावठी कट्टा अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतुसे बाळगणारा एका युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेवून त्याचेकडून गावठी बनावठीचा देशी कट्टा व एक मोटार सायकलसह१०२००० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी पुसद ग्रामीण हददीतील मौजे लोनवाडी फाट्याजवळ दि.६ नोव्हेंबर २०२४रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकास गोपनीयत बातमीदाराकडुन माहिती मिळाली की. नामे मारोतो नागोराव चिरंगे हा त्याचे ताब्यातील पल्सर मोटार सायकल मध्ये गावठी बनावटीचा देशी कट्टा बाळगुन असून तो मौजे लोनवाडी फाटा येथे त्याचे पल्सर मोटार सायकलसह थांबला आहे, माहितीचे गांभीर्य लक्षात घेवुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ लोनवाडी फाटा येथे रवाना होवुन संशयीताचा शोध घेत असतांना सदर ठिकाणी एक काळ्या रंगाच्या पल्सर मोटार सायकलसह एक युवक दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मारोती नागोराव चिरंगे वय ३२ वर्ष, रा.मधुकर नगर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ असे सांगितले त्याचे ताच्यातील पल्सर मोटार सायकलची सिटची पाहणी केली असता त्यामध्ये गावठी बनावटीचा देशी कट्टा मिळून आल्यान तो जप्त करुन ताब्यात घेतला. त्यानंतर सदरचा देशी कट्टा कोणाचा आहे व कोणाकडून घेतला याबाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले कि, सदरचा देशी कट्टा त्याचे मित्राने ते 2 महीन्यापूर्वी त्याचेकडे ठेवण्यासाठी दिला होता.देशी बनावठीचा कट्टा बाळगणारा मारोती नागोराव चिरंगे वय ३४ वर्ष, रा. मधुकर नगर पुसद ता. पुसद नि पंवतमाळ यांच्या ताब्यातून एक देशी कट्टा कीमत ३००००/-रु. २ राऊंड (काडतुस) किंमत २०००/- रु एक पल्सर मोटार सायकल क्रमांक एम एच २९ टी ८०६९ असा एकूण १०२०००/- रु मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला असून आरोपी नामे मारोती नागोराव चिरंगे वय ३४ वर्ष, रा. मधुकर नगर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ व त्याचा साथीदार यांचे विरुध्द पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५,३५, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिता सो, मा अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप तसेच सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, हवर्वधन बो.जे सो., स्थानिक गणेश शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकाते, यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि पारद लोहकरे, चापोउपनि रविंद्र श्रीरामे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहया कुणाल मुंडोकार, पोहबा रमेश राठोड, पोशि सुनिल पंडागळे, पोशि/मोहम्मद ताज सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



