काळी (दौ.) येथे पोळा ईद व गणेशोत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न!

काळी ( दौ.) प्रतिनिधी (संदीप ढगे) बुधवार १३ सप्टेंबर २०२०ला सायंकाळी ५:०० वाजता सहाय्यक पोलीस अधीक्षक मा. पंकज अतुलकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत एकता मंगल कार्यालय काळी (दौ.) येते शांतता समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी काळी (दौ.) पंचकोशीतून विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी तथा पोलीस पाटील कर्मचारी वृंद होते. संजय गायकवाड नितेश राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर हंसराज मोरे यांनी वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवण्याची मागणी केली. आझाद पाटील यांनी राष्ट्रीय एकात्मतेची भावना आपल्या चारोळीतून व्यक्त केली. श्रीनिवास मोरे यांनी सन उत्सवात कुठल्याही प्रकारचे अनिश्चित प्रकार होणार नाही अशी गावकऱ्यांच्या वतीने ग्वाही दिली. यावेळी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक मा. राजेश राठोड साहेब यांनी पोलीस प्रशासनाच्या नियमाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.
तर सहाय्यक पोलीस अधीक्षक मा. पंकज अतुलकर साहेब म्हणाले पुढे सार्वजनिक निवडणुका येत असून राजकीय लोक आपला राजकीय हेतू उंचावण्यासाठी समाजामध्ये चुकीचा संदेश देऊन गावातील वातावरण खराब करू नये आणि या उत्सवाच्या काळात वीज पुरवठा सुरळीत राहील. यासाठी आम्ही संबंधित विद्युत वितरण वाल्यांना तसे पत्र देऊ म्हणाले कुठलाही अनिश्चित प्रकार दिसल्यास पोलीस प्रशासनाची संपर्क साधा म्हणाले यावेळी सर्व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी काळी ( दौ.)ग्रामपंचायतचे पदाधिकारी राजकीय क्षेत्रातील मंडळी तथा पत्रकार बंधू सहायक पोलीस निरीक्षक बालाजी संगेपलु साहेब बीट जमादार अशोक जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



