काँग्रेसची जनसंवाद यात्रा कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्यासाठी-विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम);- काँग्रेसची जनसंवाद यात्रा जिल्ह्यात दाखल झाली असून महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे ५ सप्टेंबरला सायंकाळी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा हिवरा संगम येथे दाखल होताच विजय वडेट्टीवार यांचे स्वागत माजी आमदार विजयराव खडसे, प्रकाश पाटील देवसरकर, तातूभाऊ देशमुख, शिवाजीराव देशमुख सवणेकर, अरुण पाटील, शैलेश कोपरकरसह काँग्रेस पदाधिकाऱरी व कार्यकर्त्याकडून हिवरा बस स्थानकावर स्वागत करण्यात आले तसेच संवाद यात्रा गावातून फेरी मारून एकविरा देवी संस्थान येथे पोहोचतात विजय वडेट्टीवार यांनी येथील आई एकविरा मातेचे दर्शन घेतले संस्थानच्या सभागृहात संवाद यात्रेच्या निमित्ताने बोलताना वडेट्टीवार यांनी भाजप, शिंदेगट, सह अजित पवार गटावर जोरदार टीका केली.
येणाऱ्या काळात महाविकास आघाडीची सत्ता येणार तसेच सध्या काँग्रेसला जिल्ह्यात पूरक वातावरण आहे नेते कार्यकर्ते यांनी एकत्र येण्याची गरज आहे असेही ते म्हणाले , यावेळी महाविकास आघाडीची सत्ता आलेल्या महागाव नगरपंचायत च्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षसह विषय समिती सभापतींचा सत्कार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आला महागाव उमरखेड तालुक्यातील अनेक गावातील काँग्रेसचे नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



